मायामी, फ्लोरिडा - अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सने कारकीर्द भरात असताना दाखविलेल्या क्षमतेची पुनरावृत्ती केली. मायामी ओपन टेनिस स्पर्धेत तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला तिने ७-५, ६-३ असे हरविले. उपांत्य फेरीत व्हिनसचा सामना ब्रिटनच्या योहाना काँटाशी होईल.

व्हिनस ३६ वर्षांची आहे. तिला स्थानिक प्रेक्षकांनी जोरदार प्रोत्साहन दिले. पहिल्या सेटमध्ये दोघींना सर्व्हिस राखण्यासाठी झगडावे लागले. अँजेलिकने चार वेळा, तर व्हीनसने दोन वेळा सर्व्हिस गमावली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र व्हीनसने धडाका सुरू केला. तिने ४-१ अशी आघाडी घेतली. काँटाने रुमानियाच्या सिमोना हालेपला ३-६, ७-६ (९-७), ६-२ असे पराभूत केले. सिमोनाला तिसरे मानांकन होते. योहाना ही या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी ब्रिटनची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली. उपांत्य फेरीचा दुसरा सामना डेन्मार्कची कॅरोलीन वॉझ्नीयाकी आणि द्वितीय मानांकित चेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोवा यांच्यात होईल.