esakal | रॉजर फेडररची उपांत्य फेरीत हार
sakal

बोलून बातमी शोधा

रॉजर फेडररची उपांत्य फेरीत हार

रॉजर फेडररची उपांत्य फेरीत हार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

विंबल्डन - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररची विंबल्डनच्या पुरुष एकेरीतील संघर्षपूर्ण वाटचाल खंडित झाली. उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस राओनिचने त्याला पाच सेटच्या रोमहर्षक लढतीत हरविले.

उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मरिन चिलीचविरुद्ध फेडररने पाच सेटमध्ये विजय खेचून आणला होता. या वेळी मात्र तो अशा जिगरबाज कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. 34 वर्षांच्या फेडररला 25 वर्षांच्या राओनीचविरुद्ध पाचव्या सेटमध्ये प्रतिआक्रमण रचता आले नाही.

निकाल
पुरुष एकेरी (उपांत्य)

मिलॉस राओनीच (कॅनडा 6) वि. वि. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड 3) 6-3, 6-7 (3-7), 4-6, 7-5, 6-3.