नवी दिल्ली - भारताचा टेनिसपटू युकी भांब्री दोन वर्षांनी पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या शंभरात आला आहे. युकी क्रमवारीत २२ स्थानांची झेप घेऊन कारकिर्दीत सर्वोत्तम ८३व्या स्थानावर आला आहे. यापूर्वी भारताचा सोमदेव देववर्मन २०११ मध्ये क्रमवारीत ६२व्या स्थानावर होता. क्रमवारीतील ही सुधारणा आव्हान असल्याचे सांगून युकी म्हणाला, ‘‘ही, तर सुरवात आहे. मला अजून खूप मजल मारायची आहे. जागतिक क्रमवारीतील सुधारलेले स्थान हे मी आव्हान मानतो आणि त्यासाठी कामगिरीत सातत्य राखण्याचा मी जरूर प्रयत्न करेन.’’