
भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांब्री याची क्वीन्स ओपन स्पर्धेत कॅनडाच्या मिलॉस राओनीच याच्याशी मंगळवारी सलामी होईल. युकीने पात्रता फेरीत दोन सामने जिंकून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. युकी जागतिक क्रमवारीत 84व्या स्थानावर आहे. मिलॉसचा 35वा क्रमांक आहे. मिलॉसविरुद्ध तो कारकिर्दीत प्रथमच युकीने पात्रता फेरीत पहिल्या सामन्यात ब्रिटनच्या जेम्स वॉर्डचा 4-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. जेम्सची सध्या 407व्या क्रमांकावर घसरण झाली आहे, पण 2015 मध्ये त्याने 89व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याला "वाईल्ड कार्ड'द्वारे प्रवेश मिळाला होता.
लंडन - भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांब्री याची क्वीन्स ओपन स्पर्धेत कॅनडाच्या मिलॉस राओनीच याच्याशी मंगळवारी सलामी होईल. युकीने पात्रता फेरीत दोन सामने जिंकून मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. युकी जागतिक क्रमवारीत 84व्या स्थानावर आहे. मिलॉसचा 35वा क्रमांक आहे. मिलॉसविरुद्ध तो कारकिर्दीत प्रथमच युकीने पात्रता फेरीत पहिल्या सामन्यात ब्रिटनच्या जेम्स वॉर्डचा 4-6, 6-1, 6-2 असा पराभव केला. जेम्सची सध्या 407व्या क्रमांकावर घसरण झाली आहे, पण 2015 मध्ये त्याने 89व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याला "वाईल्ड कार्ड'द्वारे प्रवेश मिळाला होता.
दुसऱ्या सामन्यात युकीने अमेरिकेच्या टेलर फ्रीट्झला 6-4, 6-2 असा धक्का दिला. टेलर 67व्या क्रमांकावर आहे. पहिल्या सेटमध्ये युकीने नवव्या गेममध्ये ब्रेक नोंदविला. त्यानंतर सर्व्हिस राखत त्याने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या गेममधील ब्रेकसह त्याने 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याला "लव्ह'ने सेट जिंकण्याची संधी होती, पण त्याने सर्व्हिस गमावली. त्यानंतर टेलरने सर्व्हिस राखली, पण आठव्या गेममध्ये युकीने सर्व्हिस राखत विजय नक्की केला. टेलरला तिसरे, तर युकीला पाचवे मानांकन होते. हा सामना एक तास 10 मिनिटे चालला. युकीने टेलरला कारकिर्दीत प्रथमच हरविले. गेल्या वर्षी ब्रिटनमधील इल्कली येथील स्पर्धेत युकी टेलरकडून हरला होता.
मिलॉसविरुद्ध युकीचा कस लागेल. मिलॉसने 2016 मध्ये विंबल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ब्रिटनच्या अँडी मरे याने त्याच्यावर ऐतिहासिक विजय मिळविला होता. गेल्या वर्षी तो उपांत्यपूर्व फेरीत रॉजर फेडरर याच्याविरुद्ध हरला होता. मिलॉसची "ग्रास कोर्ट स्पेशालिस्ट' अशी ओळख आहे.