
VVMCM : आज १२वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन (व्हीव्हीएमसीएम) स्पर्धा पार पडली. व्हीव्हीएमसीएम पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत यंदा साताऱ्याचा कालिदास हिरवेने पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याने मॅरेथॉन पुर्ण करताना २ तास १८ मिनिटे आणि १९ सेकंद अशी वेळ नोंदवली. दीपसिंग चौधरी (2:18:24 सेकंद) उपविजेता ठरला. तर दोन वेळा विजेता, दोन वेळचा उपविजेता मोहित राठोडला (2:19.06 सेकंद) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अर्ध मॅरॅथॉनमध्ये पुरुष गटात रोहित वर्मा व महिला गटात सोनिका विजेते ठरले.