esakal | VIDEO : कुणाचं काय तर कुणाचं काय; पोलार्डचे इशारे एकदा पाहाच

बोलून बातमी शोधा

Polard
VIDEO : कुणाचं काय तर कुणाचं काय; पोलार्डचे इशारे एकदा पाहाच
sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील 24 वा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्सने हा सामना 7 विकेट्सनी जिंकत आपल्या खात्यात दोन गुण जमा केले. मुंबई इंडियन्सच्या डावातील 18 व्या षटकात एक मजेशीर किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानकडून क्रिस मॉरिस गोलंदाजी करण्यासाठी आला. केरॉन पोलार्ड स्ट्राईकवर होता. क्रिस मॉरिसने पोलार्डला बाउन्सरचा मारा केला. 18 व्या षटकातील तिसऱ्या चेंडू पोलार्डला समजण्याआधी हेल्मेटवर जाऊन आदळला. आणि मुंबई इंडियन्सच्या खात्यात 4 धावा जमा झाल्या. हेल्मेटवर आदळलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जात असताना पोलार्ड चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर जा.. असा इशारा करताना पाहयला मिळाले. पोलार्डचा हा व्हिडिओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी

आयपीएलच्या सामन्यादरम्यान मैदानातील आपल्या कृतीने लक्षवेधून घेण्यात पोलार्ड चांगलाच पटाईत आहे. यापूर्वी त्याचा राग आणि मजेशीर अंदाज असे वेगवगळे रुप सर्वांनीच अनुभवले आहे. सोशल मीडियावर याची चांगली चर्चाही रंगते. क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करण्यात आघाडीवर असलेल्या प्लेयरपैकी पोलार्ड हा एक आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्ससमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने 50 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 70 धावा केल्या. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. पॉलार्डने मुंबईसाठी विनिंग धाव घेतली. त्याने 8 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. या सामन्यातील विजयासह मुंबईने 6 पैकी 3 विजयासह 6 गुण खात्यात जमा केले आहेत.

रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला की, सलग दोन पराभवानंतर कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होते. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग तिन्ही क्षेत्रात सुरुवातीपासून चांगला खेळ करणं फायदेशीर ठरले. चेन्नईच्या तुलनेत दिल्लीचे पिच चांगले होते. खेळाडूंच्यात सकारात्मकता होती. सांघिक खेळाच्या जोरावर विजय सहज शक्य झाला, असे रोहित शर्माने म्हटले आहे.