esakal | IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी

बोलून बातमी शोधा

Quinton de Kock
IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

Mumbai vs Rajasthan, 24th Match : क्विंटन डिकॉकची नाबाद अर्धशतकी खेळी 70 (50) आणि कृणाल पांड्याने केलेली फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सनी पराभूत केले. क्रिस मॉरिसने रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. त्याने 17 चेंडूत 14 धावा केल्या. सुर्यकुमार यादवने 16 धावांची भर घालून तंबूचा रस्ता धरला. त्यालाही मॉरिसनेच बाद केले. कृणाल पांड्याच्या रुपात मिस्तफिझुरला एक विकेट मिळाली. त्याने 26 चेंडूत 39 धावा केल्या. कृणाल पांड्याने आपल्या छोट्याखानी इनिंगमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार खेचले. केरॉन पोलार्ड 8 चेंडूत 16 तर क्विंटन डिकॉक 50 चेंडूत 70 धावांवर नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सने दिल्लीतील मैदानात दमदार सुरुवात केली आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की

सलामीवीर जोस बटलर 41 (32) आणि यशस्वी जयस्वाल 32(20)धावा करत पहिल्या विकेटसाठी केलेली अर्धशतकी भागीदारी आणि त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन 42 (27) आणि शिवम दुबेने 31 चेंडूत केल्या 35 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 4 बाद 171 धावा केल्या आहेत. डेविड मिलर 4 चेंडूत 7 आणि रियान पराग 7 चेंडूत 8 धावा करुन नाबाद राहिले. मुंबई इंडियन्सकडून राहुल चाहरने 2 तर बुमराह आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.