
Pune News: 14 वर्षीय मुलांच्या चॅम्पियनशिप लीग क्रिकेट स्पर्धेत शौर्यने ठोकल्या नाबाद १७२ धावा
पुणे : पुनीत बालन केदार जाधव मेगा क्लब आयोजित 14 वर्षीय चॉम्पियनशीप मुलांच्या लीग क्रिकेट स्पर्धेत ब्रिलियंट क्रिकेट अकॅडमी विरुद्ध पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकॅडमी यांच्यात ५० षटकीय सामना खेळला गेला ब्रिलियंट संघा कडून खेळताना ११ वर्षीय "शौर्य जाधव" याने आज १७३ चेंडूत २४ चौकर मारत नाबाद 172 धावा केल्या.
या वेळी त्याला शिवरत्न सुर्यवंशी यांनी चांगली साथ देत ७६ धावा केल्या व २०१ धावांची भागीदारी केली.
सुर्यवंशी बाद झाल्यानंतर फलंदाजी साठी आलेल्या कृष्णा गायकवाड १७ धावा , व पृथ्वी पाळणे ३९ धावा करत संघाची धावसंख्या ५० षटकांत २ बाद ३४४ बनवली या धावांचा पाठलाग करताना समोरील संघ 109 धावातच सर्व बाद झाला.
गोलंदाजी मध्ये ब्रिलियंट संघाचे कृष्णा गायकवाड याने तीन विकेट पटकवल्या तर रुद्र जाधव यांनी एक विकेट घेत सामना जिंकून दिला.
172 धावा व एक गडी बाद करणारा शौर्य जाधवला सामना जिंकल्यानंतर सामनावीर म्हणून धोषीत करून पारितोषीक देण्यात याबद्दल ब्रिलियंट संघाचे प्रशिक्षक शामल सर, प्रशांत खराडे, शौर्याचे कोच अजहर सर, ॲड्. शैलेश जाधव, महेश शिंदे, दिपक जाधव, विजयजी कांबळे, डॉ. वर्षा पाटील, दिलीप तोंडे डॉ. प्रवीण माने, सिग्नेचर पार्क डांगे चौक मधील रहिवाश्यांनी व क्रिकेट वकील संघाने त्यास शुभेच्छा दिल्या.