14th Hockey Championship 2024 : गतविजेत्या मध्य प्रदेशला हरवून महाराष्ट्र अंतिम फेरीत

यजमान महाराष्ट्राने रंगतदार लढतीत गतविजेत्या मध्य प्रदेशचा २-१ असा पराभव करून चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तेथे त्यांची गाठ हरियाना संघाबरोबर पडणार आहे
Hockey Championship 2024
Hockey Championship 2024 sakal

Pune News : यजमान महाराष्ट्राने रंगतदार लढतीत गतविजेत्या मध्य प्रदेशचा २-१ असा पराभव करून चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तेथे त्यांची गाठ हरियाना संघाबरोबर पडणार आहे.

नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी मैदानावर शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत सामन्याची अखेरची आठ मिनिटे बाकी असताना महाराष्ट्र पिछाडीवर होता. मात्र, सहा मिनिटांमध्ये दोन गोल करताना त्यांनी विजय मिळवला.

खेळाच्या ५२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आकांक्षासिंगने गोल करून महाराष्ट्राला १-१ अशी बरोबरी साधून दिली, तर ५५ व्या मिनिटाला काजल आटपाडकरने केलेला मैदानी गोल निर्णायक ठरला. त्याआधी २८ व्या मिनिटाला हृतिकासिंगने गोल करीत मध्य प्रदेशला १-० असे आघाडीवर नेले. मात्र, त्यांना ही आघाडी राखता आली नाही.

उद्या (ता. २३) होणाऱ्या अंतिम फेरीत महाराष्ट्रासमोर हरियानाचे आव्हान आहे. पाच वेळच्या उपविजेत्या व कर्णधार सरिता देवीच्या नेतृत्वाखालील हरियानाने झारखंडवर ४-० असा सहज विजय मिळविला. अंतिम फेरी गाठण्याची त्यांची ही सहावी वेळ आहे.

या सामन्यात हरियाना संघाच्या नवनीत कौरने २७ व्या मिनिटाला गोल करून संघाचे खाते उघडल्यानंतर ज्योती ४० व्या मिनिटाला दुसरा, शर्मिला देवीने ४४ व्या मिनिटाला तिसरा तर दीपिकाने ५७ व्या मिनिटाला चौथा व विजया गोल केला.या दोन्ही संघात पाच वेळा सामने झाले. त्यांत हरियानाचा झारखंडवरील हा तिसरा विजय ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com