

FIFA World Cup
sakal
प्रसाद सोवनी
नाझींनी ट्रॉफी जप्त करू नये म्हणून फिफाचे उपाध्यक्ष ओत्तोरिनो बरास्सी यांनी ती रोममधल्या बँकेतून काढून आपल्या घरी पलंगाखाली एका पादत्राणांच्या खोक्यात लपवून ठेवली होती आणि संपूर्ण युद्धकाळात ती तिथेच राहिली. नाझी सैनिक घरी आले, तपास केला; पण त्यांनी पलंगाखाली काही नीट पाहिले नाही. करंडक सुरक्षित राहिला. १२ वर्षांनंतर १९५० मध्ये तो करंडक ब्राझीलला पोहोचला.