esakal | 1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिलेदार काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

Yashpal Sharma

1983 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा शिलेदार काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
सुशांत जाधव

1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे ह्रद्य विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. 1979 ते 1963 त्यांनी 37 वनडे आणि 42 कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. 37 कसोटी सामन्यात 33.45 च्या सरासरीने शर्मा यांनी 1606 धावा केल्या. 140 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. वनडेतील 42 सामन्यात 28.48 च्या सरासरीने त्यांच्या खात्यात 883 धावांची नोंद आहे. (1983 World Cup winner Yashpal Sharma dies of cardiac arrest)

हेही वाचा: ENG vs PAK : पाकिस्तानी संघ नको तिथं टॉपर; जाणून घ्या रेकॉर्ड

1983 वर्ल्ड कपचे हिरो

1983 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्याने विजयी सलामी दिली होती. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्धच्या या सलामीच्या सामन्यात दमदार खेळी साकारली होती. या सामन्यात भारतीय संघाने 76 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. निम्मा संघ 141 धावांत गारद झाला. यावेळी शर्मांनी 120 चेंडूत 89 धावांची खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने 34 धावांनी जिंकला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 40 धावा आणि इंग्लंड विरुद्ध कठीण परिस्थितीत 61 धावांची खेळी करणाऱ्या यशपाल शर्मांनी वर्ल्ड कप स्पर्धेत 34.28 च्या सरासरीने 240 धावा केल्या होत्या.

loading image