
क्रीडा विश्वाला धक्का देणारी घटना चंदीगढ विद्यापीठात घडली आहे. चंदीगढ विद्यापीठात सध्या वुशू चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेदरम्यान एका खेळाडूने जीव गमावला आहे. त्यामुळे सध्या क्रीडा विश्वातून हळहळही व्यक्त होत आहे. हा खेळाडू राजस्थान विद्यापीठाचा होता. त्याचं नाव मोहित शर्मा असल्याचे समजत असून त्याचे वय २१ वर्षे होते.