esakal | WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'
sakal

बोलून बातमी शोधा

WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

IND vs NZ, WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंडचा संघ 18 जून ते 22 जून यादरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) खिताबासाठी मैदानात उतरणार आहेत. जगभरातील क्रीडाप्रेमी या लढतीकडे लक्ष ठेवून आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाकडे एकापेक्षा एक दर्जोदार फलंदाज आणि गोलंदाजाचा भरणा आहे. आज, आपण भारतीय संघातील गेमचेंजर खेळाडूंबाबत जाणून घेणार आहोत. विश्व कसोटी अंजिक्यपद चषकावर नाव कोरण्यासाठी या खेळाडूंचा फॉर्म भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. हे तीन खेळाडू भारतीय संघाला चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलतील. (3 indian players Game Changers in wtc final)

1. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)

राहुल द्रविडचा वारसदार असलेल्या पुजारा भारतीय कसोटी संघाचा कणा मानला जातो. संयम आणि चिकाटीच्या जोरावर पुजाराने भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. पुजारा भारतीय संघाचा संकटमोचक आहे, असं म्हटल्यास वावगं वाटू नये. पुजाराने 85 कसोटी सामन्यात 6244 धावांचा पाऊस पाडला आहे. 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात पुजाराचा सिंहाचा वाटा होता. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पुजाराचा फॉर्म भारतीय संघाला चषक मिळवून देईल. तिसऱ्या क्रमांकावर पुजारा संयम आणि चिकाटीनं फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला दमवतो. जास्तीत जास्त काळ मैदानावर थांबण्याची क्षमता भारतीय संघाला विजय मिळवून देणारी आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दमवण्याचं काम पुजारा चांगल्या पद्धतीनं करु शकतो.

हेही वाचा: WTC Final : 'रोहित-विराट नव्हे पंतची भिती वाटतेय'

2. विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय संघाचा कर्णधार जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक आहे. 91 सामन्यात 7490 धावा चोपणाऱ्या विराट कोहलीनं 27 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीचं इंग्लंडमधील प्रदर्शन दमदार आहे. इंग्लंडमध्ये विराट कोहलीनं सात सामन्यात एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. विराट कोहलीची न्यूझीलंडविरोधची कामगिरी झक्कास आहे. न्यूझीलंडविरोधात घरी आणि बाहेर, दोन्हीकडे विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडला आहे. न्यूझीलंडविरोधात विराट कोहलीनं 9 सामन्यात 773 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये 211 सर्वोच्च धावसंख्या आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही विराट कोहली भारतीय संघासाठी गेमचेंजर ठरु शकतो.

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

3. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

प्रत्येक संघासाठी फलंदासोबत गोलंदाजही महत्वाची भूमिका बजावत असतो. जसप्रीत बुमराहने धारधार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजाचीचं नेतृत्व करणार आहे. बुमराहने 18 कसोटी सामन्यात 83 बळी घेतले आहेत. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बुमराह भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरेल.