
Tennis
३० व्या फ़िनेस्टा ओपन नॅशनल टेनिस चॅम्पियनशिपची सुरवात, २९ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील, डीएलटीए कॉम्पलेक्समध्ये होत आहे. डीसीएम श्रीराम लिमिटेडचा मदतीने, ही स्पर्धा ऑल इंडिया टेनिस असोसियेशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसियेशन (डीलटीए) द्वारे आयोजित केली जाते, फ़िनेस्टा ओपन ही भारतातील सर्वात मोठी स्थानिक टेनिस स्पर्धा असून, यामध्ये देशभरातून विविध खेळाडू सहभागी होतात.