38th National Games: सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका, तर जान्हवी राईकवारला कनोईंगमध्ये पदक
Maharashtra in National Games 2025: ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखली आहे, तर जान्हवी राईकवारला कनोईंगमध्ये पदक मिळाले आहे.
हल्दवानी येथे सध्या ३८वी राष्ट्रीय क्रीडा होत आहे. महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंग मधील पदकांची मालिका कायम राखताना आज (५ फेब्रुवारी) महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले.