38th National Games: मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी सुवर्ण धमाका; स्क्वॉशमध्ये महाराष्ट्राला दोन रौप्य अन् एक कांस्य

Maharashtra in 38th National Games: 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात आपले वर्चस्व प्रस्तापित केले. तसेच स्क्वॉशमध्येही महाराष्ट्राला दोन रौप्य अन् एक कांस्य पदक मिळाले.
38th National Games
38th National GamesSakal
Updated on

महाराष्ट्राच्या सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या २०० मीटर्स शर्यतीतही सोनेरी कामगिरी केली. याआधी तिने याच स्पर्धेमध्ये ४०० मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकाखेरीज महाराष्ट्राने जलतरणामध्ये तीन कांस्यपदके, तर डायव्हिंगमध्येही एक कास्यपदक जिंकले.

सान्वी देशवाल हिने दोनशे मीटर्स शर्यत दोन मिनिटे २४.९० सेकंदात पार केली. या शर्यतीमध्ये तिने ब्रेस्ट स्ट्रोक, बॅकस्टोक, बटरफ्लाय व फ्री स्टाईल या चारही शैलीमध्ये सर्वोत्तम कौशल्य दाखविले आजच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकण्याबाबत मला आत्मविश्वास होता. तरीही मी या शर्यतीबाबत योग्य नियोजन केले होते, आणि त्यानुसारच माझी कामगिरी झाली. ४०० मीटर्स पाठोपाठ आजची शर्यत जिंकल्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे, असे सान्वी देशवाल हिने सांगितले.

38th National Games
38 th National Sports Games: पुण्याच्या वैष्णव ठाकूरचा राष्ट्रीय विक्रम; स्क्वॅशमध्ये डबल धमाका! महिलांना सुवर्ण, पुरूष संघाला रौप्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com