
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. याचबरोबर राही सरनोबत व प्रवीण पाटील या जोडीने मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले.