
38th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रुती जोशीने कास्यपदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले. श्रुतीचे वडिल धर्मेद्र जोशी हे नागपूरमध्ये खाजगी वाहनावर ड्रायव्हर असून, तिचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
चौखाम्बा हॉलमध्ये सुरू असलेल्या तलवारबाजीतील सायबर प्रकारामध्ये नागपूरच्या श्रुती जोशीने नेत्रदीपक कामगिरी केली. साखळी सामन्यांमध्ये पहिल्या 32 मध्ये अव्वल स्थान संपादन करून श्रुती पदकची दावेदार बनली होती.सलामीच्या लढतीत हरियाणाच्या मंजूवर 15-2 गुणांनी श्रुतीने दणदणीत विजय मिळविला. जम्मू काश्मीरच्या श्रेयावर 15-10 गुणांनी मात करून तिने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सुपर 8 लढतीत छत्तीसगडच्या वेदिका खुशीवर तिने 15-10 गुणांनी मोठा विजय संपादन करून पदक निश्चित केले.