
प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या तेजस शिरसे याने १०० मीटर अडथळा शर्यतीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले.
मात्र, छ्त्रपती स्नभाजिंगरचा तेजसला तुल्यबळ लढत देणारा महाराष्ट्राचा सिद्धांत थिंगलिया (मुंबई) अर्ध्या शर्यतीत अडखळून खाली पडल्याने त्याचे हक्काचे रौप्यपदक हुकल्याने महाराष्ट्रीयन चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत मुंबईची ऐश्वर्या मिश्रा हिने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदकाला गवसणी घातली.