CSK संघाची 2023 मधील धूरा 4 विदेशी खेळाडूंच्या हाती?

आयपीएलच्या महाकुंभात 2023 मध्ये सीएसकेचा कॅप्टन कोण होणार? याची चर्चा रंगली आहे.
CSK
CSKesakal

गतवर्षी चॅम्पीयन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी यंदाच्या सीझनमध्ये निराशजनक ठरली आहे. यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईने आत्तापर्यंत 13 मॅच खेळल्या आहेत. त्यामधील 4 सामने जिंकले असून 9 सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. या पराभवासह सध्या चेन्नईच्या ताफ्यात सर्वकाही अलबेल असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच 2023 मध्ये या संघाचा कॅप्टन कोणा होणार अशी चर्चा आयपीएलच्या महाकुंभात रंगली आहे.

CSK
MI च्या अखेरचा सामन्यात खेळणार 'अर्जून', कॅप्टन रोहितने दिले संकेत

यंदाच्या सीझनमध्ये चेन्नईचा नवा कॅप्टन पाहायला मिळाला पण 15 व्या सीझनची सीएसकेची सुरुवात खराब झाल्याने जडेजाने कॅप्टन्सी पुन्हा धोनीच्या हाती सोपावली. मात्र, धोनीकडे खुप कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे 2023 मध्ये चेन्नईचा कॅप्टनहा परदेशा असू शकतो. त्यासाठी चार परदेशी खेळडूंची नावं समोर आली आहेत.

1. केन विल्यमसन

आयपीएलच्या महाकुंभात 2023 मध्ये सीएसकेचा कॅप्टन केन विल्यमसन हा होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. सनरायझर्स हैदराबादने 2022 मेगा ऑक्शनमध्ये 14 कोटी देत केनला विकत घेतले होते. मात्र तो यंदाच्या सीझनमध्ये अपयशी ठरला आहे.

हैदराबाद क्वालिफाय न झाल्याने कदाचित आगामी सीझनमध्ये विल्यमसनला हैदराबाद रिलीज करु शकते.

CSK
'बूम-बूम' बुमराह! T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू

2. बेन स्टोक्स

इंग्लंडचा नवा टेस्ट कॅप्टन बेन स्टोक्स यापूर्वी महेंद्र सिंह धोनीसोबत खेळला आहे. जर आयपीएल 2023 मध्ये त्याला सीएसकेने विकत घेतले तर तो संघाचा कॅप्टन होऊ शकतो. त्याची कॅप्टन्सी सीएसकेला यशाच्या शिखरावर पोहचवू शकते.

स्टोक्सने आत्तापर्यंत 43 सामने खेळले आहेत. त्याने 134.5 च्या स्ट्रइक रेटच्या मदतीने 920 धावा केल्या आहेत.

3. जो रूट

जो रुट हाही इंग्लंडचा खेळाडू आहे. सीएसकेच्या कॅप्टन्सी रडारावर जो रुट असु शकतो. रुटने भाराताच्या मैदानात चांगले प्रदर्शन केलं आहे. तसेच त्याला कॅप्टन्सी पदाचा अनुभव आहे.

इंग्लंडच्या या माजी कर्णधाराला टी 20 मॅच खेळण्याचा अनुभव आहे. त्याने आत्तापर्यंत 83 मॅच खेळल्या असून 126.76 स्ट्रइक रेटच्या मदतीने 1994 धावा केल्या आहेत. त्याने 13 अर्धशतके झळकावी आहेत.

4. टेम्बा बावुमा

दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज टेम्बा बावुमाने आपल्या कॅप्टन्सी निर्णयाने अनेकांन चकित केले आहे. जर वाइल्डकार्डवर सीएसकेने खरेदी केलं तर बावुमादेखील सीएसकेचे कर्णधार असू शकतात. कारण तो एक चांगला लीडर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com