'बूम-बूम' बुमराह! T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू |Jasprit Bumrah First Indian Bowler | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets

'बूम-बूम' बुमराह! T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू

MI vs SRH IPL 2022: आयपीएलमध्ये 65 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. सामन्यात मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने एक अनोखा विक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने T-20 क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा बुमराहरा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. जसप्रीत बुमराहने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात फक्त एक विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदरला जसप्रीत बुमराहने क्लीन बोल्ड करत त्याच्या T-20 क्रिकेटमधील 250 विकेट पूर्ण केल्या. (Jasprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets In t20 Most Wickets)

हेही वाचा: कोलकताला मोठा विजय आवश्यक, दोन पराभवांमुळे लखनौचाही कस लागणार

जसप्रीत बुमराहच्याT-20 रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 206 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 250 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, गुजरात व्यतिरिक्त भारतासाठी खेळलेल्या टी-20 सामन्यांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराहला 250 विकेट मिळाली तेव्हा त्याची पत्नी टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशन देखील मैदानात होती. या हंगामात बुमराहने 13 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा: डेव्हिडच्या झंझावाती खेळीनंतरही मुंबईचा पराभव; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

T-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

  • जसप्रीत बुमराह - 250 विकेट्स

  • भुवनेश्वर कुमार - 223 विकेट्स

  • जयदेव उनाडकट - 201 विकेट्स

  • विनय कुमार - 194 विकेट

  • इरफान पठाण - 173 विकेट्स

Web Title: Jasprit Bumrah First Indian Bowler 250 Wickets In T20 Most Wickets Mi Vs Srh Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top