खेळाडूंनी श्वास घ्यायचा का नाही?; पाच देशांचे संघ भारतात येणार

5 countries will play series India
5 countries will play series India

दावणीला बांधलेला भारतीय क्रिकेट संघ आणखी एका भरगच्च मोसमाला सज्ज होतोय... नाही सज्ज झालेला आहे. जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जेथे दिवसभर सूर्यप्रकाश असतो... तसे क्रिकेटविश्‍वात भारत असा देश आहे ज्याचा संघ बाराही महिने खेळत असतो. फार लांबचा विचार नको, गेल्या मार्चपासून (आयपीएल आणि विश्‍वकरंडक) असे चार महिने खेळल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीजमध्ये आहे, तेथून परतल्यावर मायदेशात मालिकांचा धूमधडाका आहे. त्यातच न्यूझीलंड दौरा 18 मार्चला मायदेशात अखेरचा सामना संपल्यानंतर काही दिवसांत पुन्हा मेच्या अखेरपर्यंत रंगणारी आयपीएल... मोजता मोजता दम लागतो तर खेळणाऱ्यांची काय अवस्था? 

उसंत हा शब्द कदाचित भारतीय क्रिकेट संघाच्या शब्दकोशात नसावा. म्हणूनच कोणताही महिना पाहा, हा भारतीय संघ कोठेना कोठे खेळत असतोच आणि चर्चेतही असतो. अगदीच अपवादात्मक दिवस पाहिले ज्या वेळी भारतीय संघ खेळत नसेल तेव्हा त्या खेळाडूंना आणि प्रेक्षकांनाही चुकचुकल्यासारखे वाटत असेल. प्रायोजकही महिन्यातील खेळण्याचा दिवसाचा हिशेब मांडून प्रायोजकत्व देत असतील यात शंका नाही. खेळाडूंच्या विश्रांतीचा मुद्दा तो काय एवढा महत्त्वाचा नसावा. आता तर कसोटी अजिंक्‍यपद आणि एकदिवसीय मालिका आयसीसीनेच तयार केली आहे. त्यामुळे सातत्याने सर्वांनाच खेळावे लागणार आहे. आता हेच पाहा ना, 2019 हे वर्ष अजून संपलेले नाही तोच 2020 मधील भारताच्या सामन्यांची बेगमी झालेली आहे. 

पाच देशांचे संघ येणार 
गेला मोसम परदेशातील मालिकांमध्ये खेळण्यात गेला, यंदा मायदेशात भारतीय संघ जास्त खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि पुन्हा दक्षिण आफ्रिका असे पाच देश भारतात खेळण्यासाठी येणार आहेत. त्यातच आपला संघ न्यूझीलंडचाही दौरा करणार आहे. 

टाईमझोन कसे साधणार 
एवढ्या मालिका खेळायच्या असतील तर साहाजिकच दोन देशांच्या मालिकांमधील अंतर कमी होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 19 जानेवारीला संपणार आणि न्यूझीलंड दौऱ्यातील पहिला सामना 24 जानेवारीला होणार, म्हणजे मध्ये अवघे तीनच दिवस भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेळेत साडेसहा तासांचा फरक आहे. तीन दिवसांत जेट लॅग तरी दूर होईल का ? मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्या टर्ममध्ये खेळाडूंवर येणारा ताण, यावर आवाज उठवला होता. दोन देशांविरुद्ध होणाऱ्या मालिकांमध्ये पुरेशी विश्रांती असावी, असे त्यांनी मत मांडले होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या दुखापतींतून सावरता येऊ शकते, असे ते म्हणाले होते. पण कसलं काय... 

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 
तीन ट्‌वेंटी20 आणि तीन कसोटी मालिका 
- 15 सप्टेंबर : पहिली टी-20 (धर्मशाला) 
- 18 सप्टेंबर : दुसरी टी-20 (मोहाली) 
- 22 सप्टेंबर : तिसरी टी-20 (बंगळूर) 
- 2 ते 6 ऑक्‍टोबर : पहिली कसोटी (विशाखापट्टणम) 
- 10 ते 14 ऑक्‍टोबर : दुसरी कसोटी (पुणे) 
- 19 ते 23 ऑक्‍टोबर : तिसरी कसोटी (रांची) 

बांगलादेशचा भारत दौरा 
तीन ट्‌वेन्टी-20 आणि दोन कसोटी 
- 3 नोव्हेंबर : पहिली टी-20 (दिल्ली) 
- 7 नोव्हेंबर : दुसरी टी-20 (राजकोट) 
- 10 नोव्हेबर : तिसरी टी-20 (नागपूर) 
- 14 ते 18 : नोव्हेंबर : पहिली कसोटी (इंदूर) 
- 22 ते 26 : नोव्हेंबर : दुसरी कसोटी (कोलकाता) 

वेस्ट इंडीजचा भारत दौरा 
तीन ट्‌वेन्टी-20 आणि तीन एकदिवसीय मालिका 
- 6 डिसेंबर : पहिली टी-20 (मुंबई) 
- 8 डिसेंबर : दुसरी टी-20 (तिरुअनंतपुरम) 
- 15 डिसेंबर : पहिला एकदिवसीय सामना (चेन्नई) 
- 18 डिसेंबर : दुसरा एकदिवसीय सामना (विशाखापट्टणम) 
- 22 डिसेंबर : तिसरा एकदिवसीय सामना (कटक) 

झिम्बाब्वेचा भारत दौरा 
तीन ट्‌वेन्टी-20 मालिका 
- 5 जानेवारी : पहिली टी-20 (गुवाहाटी) 
- 7 जानेवारी : दुसरी टी-20 (इंदूर) 
- 10 जानेवारी : तिसरी टी-20 (पुणे) 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 
तीन एकदिवसीय सामने 
- 14 जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना (मुंबई) 
- 17 जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट) 
- 19 जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना (बंगळूर) 

भारताचा न्यूझीलंड दौरा 
पाच टी-20, तीन एकदिवसीय, दोन कसोटी मालिका 
- 24 जानेवारी : पहिली टी-20 (ऑकलंड) 
- 26 जानेवारी : दुसरी टी-20 (ऑकलंड) 
- 29 जानेवारी : तिसरी टी-20 (हॅमिल्टन) 
- 31 जानेवारी : चौथी टी-20 (वेलिंग्टन) 
- 2 फेब्रुवारी : पाचवी टी-20 (मॉंट मॉन्टगनी) 
- 5 फेब्रुवारी : पहिला एकदिवसीय सामना (हॅमिल्टन) 
- 8 फेब्रुवारी : दुसरा एकदिवसीय सामना (ऑकलंड) 
- 11 फेब्रुवारी : तिसरा एकदिवसीय सामना (मॉंट मॉन्टगनी) 
- 21 ते 25 फेब्रुवारी : पहिली कसोटी (वेलिंग्टन) 
- 29 फेब्रुवारी ते 4 मार्च : दुसरी कसोटी (ख्राईस्टचर्च) 

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 
तीन एकदिवसीय सामने 
- 12 मार्च : पहिला एकदिवसीय सामना (धरमशाला) 
- 15 मार्च : दुसरा एकदिवसीय सामना (लखनौ) 
- 18 मार्च : तिसरा एकदिवसीय सामना (कोलकाता) 

- आयपीएलपर्यंत यंदा भारतीय संघ 7 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 17 ट्‌वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com