कारकिर्दित 0 नो बॉल! अर्शदीपनं या 5 गोलंदाजांकडून शिकावं | Arshdeep Singh No Ball | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arshdeep Singh No Ball 5 cricketers who never bowled a no-ball

Arshdeep Singh No Ball : कारकिर्दित 0 नो बॉल! अर्शदीपनं या 5 गोलंदाजांकडून शिकावं

Arshdeep Singh No Ball : श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 16 धावांनी पराभव झाला. या सामन्यात भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने तब्बल 7 नो बॉल टाकले. भारताने जवळपास फ्री हिटवर 34 धावा दिल्या. यानंतर अर्शदीपवर चौहूबाजूंनी टीका होऊ लागली. कोणताही गोलंदाज मुद्दाम नो बॉल टाकत नाही. अनावधानाने अशा गोष्टी घडून जातात. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही गोलंदाजही आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दित एकही नो बॉल टाकलेला नाही. असेच 5 एकही नो बॉल न टाकणारे गोलंदाज आपण पाहणार आहोत.

(5 cricketers who never bowled a no-ball)

हेही वाचा: Jay Shah Najam Sethi : करारा जवाब! पंगा घेणाऱ्या पाक बोर्डाच्या अध्यक्षांची ACC नेच केली बोलती बंद

1 लान्स गिब्स (Lance Gibbs)

वेस्ट इंडीजचे महान खेळाडू लान्स गिब्ज यांनी 79 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारे ते पहिले फिरकीपटू ठरले होते. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दित एकही नो बॉल टाकलेला नाही. अशी किमया साधणारे ते एकमेव फिरकीपटू आहेत.

1 लान्स गिब्स (Lance Gibbs) वेस्ट इंडीजचे महान खेळाडू लान्स गिब्ज यांनी 79 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स घेणारे ते पहिले फिरकीपटू ठरले होते. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दित एकही नो बॉल टाकलेला नाही. अशी किमया साधणारे ते एकमेव फिरकीपटू आहेत.

2 इयान बोथम (Ian Botham)

इंग्लंडचे महान अष्टपैलू खेळाडू इयान बोथम हे त्या काळी इंग्लंडचे स्टार खेळाडू होते. त्यांनी आपल्या 16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दित एकही नो बॉल टाकला नाीह. त्यांनी इंग्लंडकडून 102 कसोटी आणि 116 वनडे सामने खेळले आहे.

2 इयान बोथम (Ian Botham) इंग्लंडचे महान अष्टपैलू खेळाडू इयान बोथम हे त्या काळी इंग्लंडचे स्टार खेळाडू होते. त्यांनी आपल्या 16 वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दित एकही नो बॉल टाकला नाीह. त्यांनी इंग्लंडकडून 102 कसोटी आणि 116 वनडे सामने खेळले आहे.

3 इम्रान खान (Imran Khan)

पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून देणारे वेगवान गोलंदाज इम्रान खान हे जागतिक स्तरावरील एक महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दित 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले आहेत. मात्र एकाही सामन्यात त्यांनी एकही नो बॉल टाकलेला नाही.

3 इम्रान खान (Imran Khan) पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून देणारे वेगवान गोलंदाज इम्रान खान हे जागतिक स्तरावरील एक महान वेगवान गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दित 88 कसोटी आणि 175 वनडे सामने खेळले आहेत. मात्र एकाही सामन्यात त्यांनी एकही नो बॉल टाकलेला नाही.

4 डेनिस लिली (Dennis Lillee)

ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली हे आपल्या वेगासाठी जगविख्यात होते. मात्र तरी देखील त्यांनी एकदाही क्रिजची लाईन क्रोस केली नाही. त्यांनी आपल्या 70 कसोटी आणि 63 वनडे सामन्यांच्या कारकिर्दित एकदाही नो बॉल टाकला नाही.

4 डेनिस लिली (Dennis Lillee) ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली हे आपल्या वेगासाठी जगविख्यात होते. मात्र तरी देखील त्यांनी एकदाही क्रिजची लाईन क्रोस केली नाही. त्यांनी आपल्या 70 कसोटी आणि 63 वनडे सामन्यांच्या कारकिर्दित एकदाही नो बॉल टाकला नाही.

5 कपिल देव (Kapil Dev)

भारताचे महान अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी भारताला 1983 चा वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दित 131 कसोटी आणि 225 वनडे सामने खेळले. इतके सामने खेळूनही त्यांच्या नावावर एकही नो बॉल नाही.

5 कपिल देव (Kapil Dev) भारताचे महान अष्टपैलू खेळाडू आणि वेगवान गोलंदाज कपिल देव यांनी भारताला 1983 चा वर्ल्डकप जिंकून दिला होता. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दित 131 कसोटी आणि 225 वनडे सामने खेळले. इतके सामने खेळूनही त्यांच्या नावावर एकही नो बॉल नाही.