Jay Shah Najam Sethi : करारा जवाब! पंगा घेणाऱ्या पाक बोर्डाच्या अध्यक्षांची ACC नेच केली बोलती बंद

Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC
Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC esakal

Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC : एशियन क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष जय शहा यांनी गुरूवारी ट्विट करत आशिया कप आणि येणाऱ्या दोन वर्षांचे शेड्युल जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिरची लागली होती. त्यांचे चेअरमन नजम सेठी यांनी ट्विट करत जय शहांवर खोचक टीका केली. या ट्विटला जय शहांनी नाही तर खुद्द एशियन क्रिकेट काऊन्सीलनेच सेठींना प्रत्युत्तर दिले होते.

Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC
Virat Kohli : विराट जिथे नतमस्तक झालाय 'त्या' बाबांपुढे खुद्द स्टीव्ह जॉब्ज देखील डोके टेकायचा

जय शहा यांनी आशिया कपचा कार्यक्रम जाहीर केला त्यावेळी नजम सेठी यांनी आरोप केला की शेड्युल प्रसिद्ध करण्याचा निर्णय हा कोणाला विचार न घेता घेण्यात आला आहे. ज्या देशाकडे आशिया कपचे यजमानपद आहे त्या देशाला देखील घोषणा करण्यापूर्वी विचारण्यात आले नाही.

मात्र आता एशियन क्रिकेट काऊन्सीलने नजम सेठींच्या या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. एसीसीने स्पष्ट केले की हे शेड्युल डेव्हलपमेंट समिती आणि फायनान्स - मार्केटिंग समितीच्या मिटिंगमध्येच पास झाले होते. एसीसीने सांगितले की या विषयी सर्व सभासद देशांना ई-मेल करून याची माहिती देखील देण्यात आली होती.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देखील 22 डिसेंबर 2022 मध्ये एक ई-मेल पाठवण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून या ई-मेलवर कोणतेही उत्तर किंवा सल्ला आला नाही. यानंतर नियमानुसार जय शहा यांनी हे शेड्युल प्रसिद्ध केले. सेठींच्या सोशल मीडियावरून वक्तव्य करण्याला काही आधार नाहीये. एसीसी ही वक्तव्ये खोडून काढते. (Sports Latest News)

Jay Shah Najam Sethi Asia Cup 2023 ACC
Arjun Tendulkar: अर्जुनच्या बॅटला लागला गंज! सचिनच्या लेकाचं करियर सुरू होताच संपणार?

एसीसी पुढे म्हणते की, 'आम्हाला असे समजले आहे की पीसीबी चेअरमन नजम सेठी यांनी एसीसी अध्यक्षांवर एकतर्फी निर्णय घेऊन दोन वर्षाचे शेड्युल तयार केल्याचा आरोप केलाय. एसीसी स्पष्ट करू इच्छिते की बोर्डाने एका विशिष्ठ प्रक्रियेद्वारेच हे निर्णय घेतले आहेत. हा स्पर्धेंचा आराखडा डेव्हलपमेंट समिती आणि फायनान्स - मार्केटिंग समितीच्या मिटिंगमध्ये पास झाला होता. ही बैठक 13 डिसेंबप 2022 ला झाली होती.'

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com