वर्ल्ड कप जिंकून कपिलच्या संघानं त्याला पेपर खायला भाग पाडलं

वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचं रिटर्न तिकिट सेमीफायनल सामन्याच्या आधीच बूक करण्यात आलं होतं.
kapil dev david frith
kapil dev david frith
Summary

वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाचं रिटर्न तिकिट सेमीफायनल सामन्याच्या आधीच बूक करण्यात आलं होतं.

क्रिकेटविश्वात सध्या भारतीय संघाचा (Team India) दबदबा असला तरी पहिला वहिला क्रिकेट वर्ल्ड कप (World Cup) जिंकला तेव्हा भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपच वेगळा होता. भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला होता. मात्र सेमिफायनलच्या आधीच संघाचे रिटर्न तिकिट बूक करण्यात आले होते. शिवाय ज्या लॉर्ड्स (Lords) मैदानावर फायनल जिंकली तिथल्या प्रवेशिकासुद्धा भारतीय संघाला देण्यात आल्या नव्हत्या. कारण त्याआधी भारताचा एकही सामना लॉर्डसवर नव्हता आणि भारत वर्ल्ड कपमध्ये एकही सामना जिंकणार नाही अशीच काहीशा प्रतिक्रिया होत्या. मात्र भारताने सर्वांचा अंदाज चुकवला आणि थेट वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

भारतीय क्रिकेटच्या या सुवर्णक्षणांवर ८३ (83 movie) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारली आहे. तर संघाचे तत्कालीन व्यवस्थापक मान सिंह (Man Singh) यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आहे. मान सिंह यांनी तेव्हा भारताच्या विजयानंतर एका पत्रकाराला त्याचेच शब्द कसे खावे लागले याचा किस्सा सांगितला आहे.

भारताने १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजडन (Wisden) या मासिकाचे संपादक राहिलेल्या डेव्हिड फ्रिथ (David Frith) यांनी टीम इंडियाला कमी लेखलं होतं. त्यांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापनाला पत्र लिहून असं सांगितलं होतं की, भारताची वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पात्रता नाही. भारत जर वर्ल्ड कप जिंकला तर मी माझे शब्द खाईन. याच पत्राला मान सिंह यांनी उत्तर दिलं होतं.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पहिले दोन सामने जिंकले होते. यानंतर दोन सामने गमावले. मात्र पुढचे सामने जिंकत भारताने सेमीफायनलला धडक मारली. तिथे इंग्लंडला पराभूत करून फायनल गाठली. पुन्हा भारतासमोर बलाढ्य अशा वेस्ट इंडिजचे आव्हान होते. पण लॉर्डसवर रंगलेल्या अंतिम सामन्यात भारताने १८३ धावा करूनही गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला आणि वर्ल्ड कपमध्ये इतिहास घडवला.

kapil dev david frith
'सुर्या'नं आग ओकली! 152 चेंडूत कुटल्या 249 धावा

भारतीय क्रिकेट संघाची ही कामगिरी अविश्वसनीय अशीच होते. टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव जगभरातून केला जात होता. पहिलं वहिलं विजेतेपद पटकावल्यानंतर व्यवस्थापक मान सिंह यांनी डेव्हिड फ्रिथ या पत्रकाराला त्याच्या पत्राची आठवण पत्रातून करून दिली. भारत जिंकला तर शब्द खाईन म्हणणाऱ्या डेव्हिडला तुम्ही तुमचा शब्द कधी पूर्ण कऱणार असा प्रश्न मान सिंह यांनी विचारला होता.

डेव्हिड फ्रिथ यांनी मान सिंह यांच्या पत्रानंतर पेपर खाल्ला, त्यासोबत त्यांनी चॉकलेटचे तुकडे खाल्ले होते. इतकंच नव्हे तर दैनिकामध्ये मान सिंह यांनी लिहिलेल्या पत्रासोबत तो फोटोही छापला होता. भारताने मला माझेच शब्द खायला भाग पाडलं अशा हेडिंगसह फोटो पेपरमध्ये प्रकाशित झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com