गेल-डिव्हिलियर्स खेळत नसले तरी आरसीबीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये

आरसीबीने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.
rcb
rcb esakal

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मंगळवारी सोशल मीडियावर काही फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केले आहेत. एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आरसीबीच्या पहिल्या हॉल ऑफ फेममध्ये, आयपीएलचा भाग नसलेल्या या दोन दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे आरसीबी हॉल ऑफ फेम लॉन्च करणारी आयपीएलची पहिली फ्रेंचायजी आहे.

rcb
टीम इंडियाच्या ताफ्यात लवकरच 'या' घातक बॉलर्सची होणार एन्ट्री

आरसीबीने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये डिविलियर्स आणि ख्रिस गेल व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारा आरसीबीच्या संघासोबत बोलताना दिसत आहेत. संवादापूर्वी संघाने दोन्ही दिग्गजांचे टाळ्यांचा गडगडात करत स्वागत केलं.

व्हिडिओमध्ये आरसीबीचे क्रिकेट संचालक माइक हेसन आणि माजी कर्णधार विराट कोहलीही या खास प्रसंगी बोलताना दिसत आहेत. गेल आणि डिव्हिलियर्स या दोघांनी 2011 मध्ये आरसीबीकडून खेळायला सुरुवात केली आणि बराच काळ ते फ्रँचायझीसोबत आहेत. 2017 च्या मोसमानंतर गेलने आरसीबीशी फारकत घेतली होती जेव्हा फ्रँचायझीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे डिव्हिलियर्सने मागील हंगाम संपल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

rcb
'मी केवळ 24 वर्षाचा' ऋषभ पंत असे का म्हणाला?

यावेळी एबीने आपले मत व्यक्त केलं. खरं सांगायच झालं तर मी खुप भावुक झालो आहे. आणि हे तुम्हालादेखील माहिती आहे. मी क्रिकेटमधून बाहेर पडलो आहे. मी तुम्हाला फक्त टीव्हीवर पाहून मला आता सीझनमध्ये येणाऱ्या गोष्टींबद्दल उत्सुकता वाटते. मला विश्वास आहे की ते खूप खास असणार आहे. विराट आणि फ्रँचायझीशी संबंधित सर्वांचे आभार.

आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी झालेला गेल म्हणाला, मी आरसीबी फ्रँचायझीचे आभार मानू इच्छीत आहे. हा संघ माझ्यासाठी खूप खास आहे. आणि कोणत्या विशेष क्लबमध्ये असणे खुप छान आहे. मी आरसीबीला नेहमी हृदयाजवळ ठेवेण. आरसीबीच्या प्रवासादरम्यान विशेष खेळाडू आणि कोचसोबत माझे खास असे नातं जोडले गेले आहे. अशी भावना गेलने यावेळी व्यक्त केली.

एबीने आरसीबीकडून एकूण 157 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 37 अर्धशतकाच्या मदतीने त्याने 4500 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. तो टी 20 क्रिकेटमधील सर्वात खतरनाक फलंदाज आहे. तर गेलने आरसीबीकडून 91 मॅच खेळले असून 3420 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतक आणि 21 अर्धशतक झळकावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com