esakal | तू ट्रॉफीपेक्षाही मौल्यवान; डिव्हिल्यर्सने केले विराटचे कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

विराट कोहली

तू ट्रॉफीपेक्षाही मौल्यवान; डिव्हिल्यर्सने केले विराटचे कौतुक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा निवृत्त क्रिकेटपटू एबी डिव्हिल्यर्स यांची बंगळूर संघातील मैत्री फारच घनिष्ठ होते. आता विराटने बंगळूर संघाचे नेतृत्व सोडल्यामुळे डिव्हिल्यर्सही भावनिक झाला. स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा हे तू प्रत्येकाला शिकवले, तू आयपीएल ट्रॉफीपेक्षा आमच्यासाठी मौल्यवान आहेस, अशा शब्दांत डिव्हिल्यर्सने विराटला सलाम केला.

नऊ वर्षे बंगळूर संघाचे नेतृत्व करत असलेल्या विराटला अखेरपर्यंत आयपीएल जिंकता आली नाही. या वर्षात विराटचा सखा असलेला डिव्हिल्यर्स म्हणतो, कर्णधारपदाच्या गेल्या नऊ वर्षांत मी तुझ्यासोबत होतो. तुझ्यासाठी कृतज्ञ हा शब्द मला मोलाचा वाटतो, आमच्या सर्वांच्या पुढे तू होतास हे आमचे भाग्य, असा भावनिक व्हिडीओ डिव्हिल्यर्सने विराटच्या सन्मानार्थ पोस्ट केला आहे.

ज्या प्रकारे तू नेतृत्व करून प्रत्येकाला प्रोत्साहित करत होतास, त्याचा फायदा मलाही झाला. एक चांगली व्यक्ती म्हणूनही मी माझ्यात बदल करू शकतो. तुला कळलेही नसेल तेवढा तुझा प्रभाव आमच्यावर पडलेला आहे आणि याची लांबी मोजताही येणार नाही, असेही डिव्हिल्यर्सने म्हटले आहे.

आता पंच शांत झोपतील

कोलकाता संघाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली एका पायचीतच्या निर्णयावरून मैदानावरील पंच वीरेंद्र शर्मा यांच्याशी वाद घालत होता. विराट जरा जास्तच भडकल्याचे दिसू लागताच डिव्हिल्यर्सने त्याला बाजूला केले. या प्रसंगाचा दाखला देत डिव्हिल्यर्स विनोदाने म्हणाला, आता आयपीएलमध्ये तू कर्णधार नसल्यामुळे पंच शांत झोप घेतील.

loading image
go to top