निवडसमिती सदस्य कुरविला यांनी पद सोडले

Abey Kuruvilla Resignation as West Zone selector in the senior selection committee
Abey Kuruvilla Resignation as West Zone selector in the senior selection committee ESAKAL
Updated on

भारतीय क्रिकटे बोर्डला (BCCI) आता पश्चिम विभागासाठी नवे निवडसमिती सदस्य शोधावे लागणार आहेत. भारताचा माजी वेगवान गोलंदाज अॅबी कुरविला (Abey Kuruvilla) यांनी अचानक आपले पद सोडले आहे. कुरविला यांची डिसेंबर 2020 मध्ये वरिष्ठ निवडसमितीमध्ये (Senior Selection Committee) पश्चिम विभागाचा निवडसमिती सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. कुरविला यांनी यापूर्वी भारतीय ज्यूनियर निवडसमितीच्या सचिव पदाची जबाबदारी सांभळली होती. त्यांच्या कार्यकाळात उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने 2012 मध्ये 19 वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता.

Abey Kuruvilla Resignation as West Zone selector in the senior selection committee
Hijab Row: स्टार फुटबॉलर पोग्बाची हिजाब वादात उडी

बीसीसीआयच्या नव्या घटनेनुसार एखाद्या व्यक्ती संस्थेतील कोणत्याही समितीत 5 वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. मुंबईचा माजी वेगावान गोलंदाज अॅबी कुरविला यांची वरिष्ठ निवडसमितीत पश्चिम विभागाचा निवडसमिती सदस्य (West Zone Selector) म्हणून 2020 मध्ये नियुक्ती झाली होती. ज्यूनियर निवडसमिती सचिव आणि वरिष्ठ निवडसमितीत पश्चिम विभागाचा निवडसमिती सदस्य असा दोन्ही पदांचा कार्यकाळ मिळून कुरविला यांची 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कुरविला यांनी 90 च्या दशकात भारताकडून 10 कसोटी आणि 25 वनडे सामने खेळले होते.

Abey Kuruvilla Resignation as West Zone selector in the senior selection committee
IPL 2022 Auction : कोणावर लागणार सर्वोच्च बोली; कुठं पहायचा Live लिलाव?

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार कुरविला यांचा कार्यकाळ संपला आहे. आता बीसीसीआय त्या पदासाठी अर्ज मागवणार आहे. याबाबतची मुलाखत क्रिकेट सल्लागार समिती घेणार आहे. वरिष्ठ निवड समितीमध्ये आता फक्त चार सदस्य राहिले आहेत. यात चेतन शर्मा, सुनिल जोशी, हरविंदर सिंग आणि देबाशिष मोहंती यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com