IPL 2022 Auction : कोणावर लागणार सर्वोच्च बोली; कुठं पहायचा Live लिलाव?

IPL 2022 Mega Auction Date Timing Venue live Update  Where to Watch
IPL 2022 Mega Auction Date Timing Venue live Update Where to Watchesakal
Updated on

बंगळुरू: आयपीएलचा 15 वा हंगाम एप्रिलपासून सुरू होण्याची शक्याता आहे. या हंगामापूर्वी मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या लिलावात कोणत्या संघाकडे कोणता स्टार खेळाडू जाणार हे ठरणार आहे. या लिलावापूर्वी संघांना फक्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा होती. त्यामुळे सगळ्याच संघाचा पूर्ण चेहरा मोहरा या मेगा लिलावात बदलणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामापासून आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट हे दोन संघ नव्याने समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे मेगा लिलावाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (IPL 2022 Mega Auction Date Timing Venue live Update Where to Watch)

यंदाच्या मेगा लिलावासाठी बीसीसीआयने (BCCI) 590 खेळाडू शॉर्टलिस्ट केले आहेत. यातील 228 कॅप तर 355 अनकॅप खेळाडू आहेत. तर 7 असोसिएट नेशन्सचे खेळाडू आहेत.

IPL 2022 Mega Auction Date Timing Venue live Update  Where to Watch
IPL Auction : एवढ्या कोटीत दिल्ली चांगली संघ बांधणी कशी करणार?
  • IPL 2022 Auction कधी आणि कोठे होणार आहे?

आयपीएलचा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये होणार आहे.

  • IPL 2022 Auction कोणत्या वेळी सुरू होणार आहे?

आयपीएलचे मेगा ऑक्शन भारतीय वेळेनुसार दोन्ही दिवशी सकाळी 11 वाजता सुरू होईल.

IPL 2022 Mega Auction Date Timing Venue live Update  Where to Watch
IPL Auction: स्टार 8 खेळाडू ज्यांना फ्रेंचायजीने दिलाय डच्चू!
  • IPL 2022 Auction लाईव्ह अपडेट आणि हायलाईट्स कोठे पहाल?

आयपीएल मेगा ऑक्शनच्या लाईव्ह अपडेट आणि हायलाईट्सची संपूर्ण माहिती आमच्या https://www.esakal.com/ या वेबसाईटवर तुम्हाला पहावयास मिळतील. यात कोणत्या खेळाडूला किती बोली लागली. कोणत्या संघाने कोणावर किती पैसे खर्च केले. कोण अनसोल्ड राहिला याची सगळी माहिती मिळू शकेल.

  • IPL 2022 Mega Auction चे लाईव्ह कव्हरेज कोठे बघाल?

आयपीएल मेगा ऑक्शनचे लाईव्ह कव्हरेज स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होणार आहे. याचबरोबर या लिलावाचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही Disney+Hotstarवर पाहू शकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com