महाराष्ट्र केसरी 2020 : अभिजित कटके, बाला रफीक शेख यांचा पाचव्या फेरीत प्रवेश

संदीप खांडेकर
Monday, 6 January 2020

आज सायंकाळच्या सत्रात पाचव्या फेरीतील लढती होतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

पुणे : महाराष्ट्र कुस्ती केसरी खुल्या गटातील मॅट विभागात चौथ्या फेरीत मॅट विभागात अभिजित कटके, सागर बिराजदार, हर्षवर्धन सदगीर, सचिन येलभर, तर माती विभागात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, गणेश जगताप व शैलेश शेळकेने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पाचव्या फेरीत प्रवेश केला.

आज सायंकाळच्या सत्रात पाचव्या फेरीतील लढती होतील. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व सिटी कार्पोरेशनतर्फे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

चौथी फेरी  निकाल असा :  
मॅट विभाग - 
सचिन येलभर (मुंबई उपनगर) वि. वि. प्रविण सरक (सातारा) 
हर्षवर्धन सदगीर (नाशिक जिल्हा) वि. वि.‌संग्राम पाटील (कोल्हापूर )
सागर बिराजदार (लातूर) वि. वि. आदर्श गुंड (पुणे जिल्हा )
अभिजित कटके (पुणे शहर) वि. वि. अक्षय मंगवडे (सोलापूर) 

माती विभाग -  
बाला रफीक शेख (बुलढाणा) वि. तानाजी झुंजूरके  (पुणे शहर )
ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे  (सोलापूर ) वि. वि. 
संदीप काळे (मुंबई पूर्व ) 
शैलेश शेळके (लातूर ) वि. वि. संतोष दोरवड (रत्नागिरी ) 
गणेश जगताप  (हिंगोली) वि. वि. सिकंदर शेख  (वाशिम )

चौथ्या फेरीत संग्राम पाटील पराभूत झाल्याने कोल्हापूरचे आव्हान संपुष्टात आले. नाशिक जिल्ह्याचा हर्षद सदगीर याने त्याचा 10-0ने पराभव केला. गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असतानाही तो मैदानात लढला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet katake and Bala Rafiq Shaikh advances 5th round in Maharashtra Kesari 2020