Abhimanyu Easwaran : अभिमन्यू स्वत:च्याच नावाच्या स्टेडियममध्ये खेळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhimanyu Easwaran Will play in Abhimanyu Cricket Academy stadium cricket

Abhimanyu Easwaran : अभिमन्यू स्वत:च्याच नावाच्या स्टेडियममध्ये खेळणार

देहराडून : एखादा महान खेळाडू निवृत्त झाल्यानंतर स्टेडियमला किंवा स्टेडियममधील स्टँडला त्या खेळाडूचे नाव देण्यात येते. मात्र तो खेळाडू खेळत असताना स्टेडियमला त्या खेळाडूचे नाव दिलेले अपवादात्मकच असते.

अशीच एक घटना भारतात घडली आहे. बंगाल - उत्तराखंड यांच्यामध्ये देहराडून येथे रणजी करंडकातील अ गटातील लढत खेळवण्यात येणार आहे. अभिमन्यू इस्वरन या लढतीत बंगालचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

देहराडून येथील या स्टेडियमचे नाव आहे अभिमन्यू क्रिकेट अकादमी. अभिमन्यू उद्यापासून स्वत:च्याच नावाच्या स्टेडियममध्ये खेळणार आहे. अभिमन्यू याचे वडील रंगनाथन परमेश्‍वरन यांनी २००५मध्ये देहराडून येथील जमीन विकत घेतली होती.

त्याच जमीनीवर अभिमन्यू क्रिकेट अकादमी नावाचे स्टेडियम आकाराला आले. याबाबत रंगनाथन यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, देहराडूनमध्ये वर्तमानपत्र व आईसक्रीम विकून चार्टर्ड अकाऊंटचे शिक्षण पूर्ण केले. माझे क्रिकेटवर प्रेम असल्यामुळे तिथे जमीन विकत घेऊन क्रिकेट स्टेडियम उभारले.

१०० कसोटी खेळायला हव्यात

माझ्या क्रिकेटवरील प्रेमापोटी स्टेडियम उभारले. या स्टेडियममध्ये माझा मुलगा खेळणार आहे. याचा आनंद आहे. पण माझ्या मुलाने देशासाठी १०० कसोटी खेळल्याच माझा आनंद द्विगुणीत होईल, असे रंगनाथन या वेळी म्हणाले.

माझे लहानपण देहराडून येथे गेले. येथेच माझ्या क्रिकेटचाही श्रीगणेशा झाला. आता येथे रणजी करंडकाचा सामना होत आहे. माझ्या वडीलांच्या प्रेमाचे व मेहनतीचे हे प्रतीक आहे. याचा मला अभिमान वाटतो. मात्र उद्यापासून मैदानात उतरल्यानंतर बंगालच्या विजयाकडे लक्ष असणार आहे.

— अभिमन्यू इस्वरन, क्रिकेटपटू, बंगाल

टॅग्स :Cricketsports