'धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय धोनी काही जात नाही'; अभिनेत्याची टीका

वृत्तसंस्था
शनिवार, 18 जानेवारी 2020

'बीसीसीआयने इतर खेळाडूंप्रमाणेच धोनीलाही करारातून वगळले. मला माहीत आहे की तो निवृत्त झाल्यावर त्याला सन्मानाने निरोप देण्यात येईल. पण जोपर्यंत धक्के देऊन बाहेर काढत नाहीत तोपर्यंत बाहेर जाणार नाही असे धोरण धोनीचे इतर खेळाडूंप्रमाणेच आहे.'

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. काहींचं मत होते की, त्याला वगळले हे बरेच केले. तर त्याच्या चाहत्यांना बीसीसीआयच्या करारातून वगळणे म्हणजे त्याच्या निवृत्तीची सुरवात झाली असे वाटले. अशातच अभिनेता, सोशल इन्फ्लुएन्सर कमाल आर खान याने ट्विट करत धोनीवर टीका केली आहे. 

धोनीच्या निवृत्तीची घोषणाच बाकी?; बीसीसीआयच्या करारातून बाहेर

कमाल आर खान आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'बीसीसीआयने इतर खेळाडूंप्रमाणेच धोनीलाही करारातून वगळले. मला माहीत आहे की तो निवृत्त झाल्यावर त्याला सन्मानाने निरोप देण्यात येईल. पण जोपर्यंत धक्के देऊन बाहेर काढत नाहीत तोपर्यंत बाहेर जाणार नाही असे धोरण धोनीचे इतर खेळाडूंप्रमाणेच आहे.' अशी बोचरी टीका केआरकेने धोनीवर केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धोनीने केव्हा निवृत्त व्हायचे हे पूर्णपणे त्याच्या हातात आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि कोच रवी शास्त्री यांनी सांगितले. केआरकेच्या या टीकेवर धोनी फॅन्सने त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor KRK criticized MS Dhoni after rejecting contract by BCCI