धोनीच्या निवृत्तीची घोषणाच बाकी?; बीसीसीआयच्या करारातून बाहेर

वृत्तसंस्था
Thursday, 16 January 2020

अ+ श्रेणीत बदल नाही
बीसीसीआयने अ+श्रेणीत करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या श्रेणीत भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना करारबद्ध करण्यात आले आहे. 

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल तो सध्या काय करतो, तो पुनरागमन कधी करणार किंवा तो निृत्ती कधी घेणार असे प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत. अशातच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलेल्या करारश्रेणीत त्याला कोणत्याच श्रेणीत स्थान देण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी त्याला अ श्रेणीत स्थान देण्यात आले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बीसीसीआयने आज ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी वार्षिक करारातील खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यांत धोनीचे नाव वगळण्यात आले आहे.  
धोनीबरोबरच युवा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि गेल्यावर्षी करारबद्ध केलेल्या खेळाडूंपैकी दिनेश कार्तिक आणि खलील अहमद यांनाही यंदा करारबद्ध करण्यात आलेले नाही. यंदाच्या करारात बीसीसीआयने नव्या पिढीतील खेळाडूंना संधी दिली आहे. बीसीसीआयने मयांक अगरवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर आणि दीपक चहर यांना करारबद्ध करण्यात आले आहे. 

अ+ श्रेणीत बदल नाही
बीसीसीआयने अ+श्रेणीत करारबद्ध झालेल्या खेळाडूंमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही या श्रेणीत भारताचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांना करारबद्ध करण्यात आले आहे. 

राहुल इन धोनी आउट
गेल्या वर्षी धोनीला अ श्रेणीत स्थान देण्यात आले होते. मात्र, यंदा त्याला संपूर्ण करारश्रेणीतूनच वगळण्यात आले आहे. अ श्रेणीत नव्याने फक्त लोकेश राहुलला करारबद्ध करण्यात आले आहे. गेल्यावर्षी तो ब श्रेणीत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni left out of BCCI annual central contracts list