गिलख्रिस्टने शड्डू ठोकला! म्हणे ऑस्ट्रेलिया 2004 चा करिष्मा पुन्हा करणार | India vs Australia Adam Gilchrist | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia Adam Gilchrist

India vs Australia Adam Gilchrist : गिलख्रिस्टने शड्डू ठोकला! म्हणे ऑस्ट्रेलिया 2004 चा करिष्मा पुन्हा करणार

India vs Australia Adam Gilchrist : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या कसोटी मालिकेत भातरीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 कसोटी सामने खेळणार आहे. मालिका जरी पुढील महिन्यात होत असली तरी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट आताच भारताविरूद्ध शड्डू ठोकला आहे. गिलख्रिस्ट म्हणतोय की यंदाची कसोटी मालिका भारत नाही तर ऑस्ट्रेलिया जिंकणार आहे.

हेही वाचा: Udayanraje Bhosale : महाराष्ट्र केसरी शिवराजच्या भेटीनंतर उदयनराजे म्हणाले, खेळात राजकारण...

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाचा संघ यंदाची कसोटी मालिका आपल्या नावावर करू शकतो. मला असे वाटते की यावेळी आपल्याकडे जबरदस्त प्लेईंग 11 आहे. आम्ही 2004 मध्ये ज्या संघासोबत भारताचा उतरलो होतो त्यावेळेच्या संघात आणि आता भारतात जाणाऱ्या संघात खूप समानता आहे.'

गिलखिस्ट म्हणाला की, '2004 मध्ये आम्ही आमची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला होता. मला यंदा ऑस्ट्रेलियाचा संघ असे करतो का नाही हे पाहण्यात रस आहे. भारत दौऱ्यावर संघाने फार काही न करता आपल्या फिरकीपटूंमध्ये चांगले बदल करत रहावे. मला आशा आहे की यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 2004 सारखा करिष्मा दाखवू शकतो आणि मालिका आपल्या खिशात टाकू शकतो.'

हेही वाचा: Murali Vijay : मुरली विजयने सेहवागशी केली तुलना; म्हणाला आयुष्यात त्याला जे मिळालं ते...

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुंभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केसी भरत, इशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली

तिसरी कसोटी 1 ते 5 मार्च, धर्मशाला

चौथी कसोटी 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...