Murali Vijay : मुरली विजयने सेहवागशी केली तुलना; म्हणाला आयुष्यात त्याला जे मिळालं ते... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murali Vijay Compare With Virender Sehwag

Murali Vijay : मुरली विजयने सेहवागशी केली तुलना; म्हणाला आयुष्यात त्याला जे मिळालं ते...

Murali Vijay Compare With Virender Sehwag : भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या कारकिर्दित सातत्याने आक्रमक शैलीतच फलंदाजी केली. त्याच्या या आक्रमकतेमुळे वनडे, टी 20 सामन्यातच नाही तर कसोटीत देखील मोठा फरक पडायचा. भारताला याचा चांगला फायदा देखील व्हायचा. कधी कधी आक्रमकतेच्या नादात तो आपली विकेट लवक फेकून यायचा. मात्र कर्णधार आणि संघ व्यवस्थापन कायम त्याच्या पाठीशी उभे राहिले.

हेही वाचा: IND vs NZ: पाठदुखी काही पाठ सोडेना! सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का

हाच धागा पकडून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या मुरली विजयने एक मोठे स्टेटमेंट केले आहे. मुरली विजयने दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयवर टीका करत विदेशात क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले होते. आता मुरली विजयने विरेंद्र सेहवागला जसे स्वातंत्र्य मिळाले तसे मला मिळाले नाही अशी खंत व्यक्त केली.

मुरली विजय स्पोट्सस्टारशी बोलताना म्हणाला की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला विरेंद्र सेहवाग सारखे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही. सेहवागला आयुष्यात जे काही मिळाले ते मला मिळू शकले नाही. जर त्याच्यासारखा पाठिंबा आणि संधी मिला मिळाली असती तर मी देखील त्याच्यासराखे खेळण्याचा प्रयत्न केला असता. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी कामगिरी करता हे संघाच्या पाठिंब्यावर देखील अवलंबून असते. आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला फार प्रयोग करण्याची संधी मिळत नाही.'

हेही वाचा: IND vs NZ: भविष्य अंधारातच! कोहली-रोहित बाबत गावसकरांचे मोठे वक्तव्य

विजय मानतो की सेहवागकडे विशेष गुणवत्ता होती. त्याने नॉन स्ट्राईकरला उभारून सेहवागचे कारनामे आपल्या डोळ्याने पाहिले आहेत. विजय म्हणतो की, 'तुम्हाला कायम चांगली कामगिरी करणे गरजचेचे असते. त्यामुळे तुमच्याकडे एक पॅकजच्या दृष्टीकोणातून सर्व काही असणे गरजेचे आहे. तुम्ही संघाच्या गरजेनुसार स्वतःला मोल्ड केले आहे. सेहवागला खुलेपणाने खेळताना पाहून भारी वाटायचं.'

मुरली विजय पुढे म्हणाला की, 'मला वाटते की विरेंद्र सेहवागसारखं कोणी खेलू शकत नाही. त्याने जे भारतीय क्रिकेटला दिले ते अद्भुत होते. मी प्रत्यक्ष सेहवागला खेळताना पाहिले आहे. त्याच्याशी बोलण्याचे भाग्य देखील लाभले. तो त्यावेळी अशा स्थितीत होता की गाणे म्हणत देखील 145 - 150 किमी प्रती तास वेगाने टाकणाऱ्या गोलंदाजांविरूद्ध गाणे गुणगुणत खेळत होता. ही गोष्ट सामान्य नाही.'

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...