Aditi Ashok : रौप्य पदक विजेत्या आदितीला इतिहास रचण्याची आहे सवय; भारतीय महिलांसाठी ठरतेय दीपस्तंभ

Asian Games 2023
Asian Games 2023 esakal

Aditi Ashok Asian Games 2023 : भारताची गोल्फपटू आदिती अशोकने महिला एशियन गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. भारताकडून एशियन गेम्समध्ये गोल्फमध्ये पदक जिंकणारी आदिती ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

Asian Games 2023
Asian Games 2023 : ट्रॅप शुटिंगमध्ये पुरूषांचे एक पाऊल पुढे; केली सुवर्ण कामगिरी

भारताची 25 वर्षाची आदिती ही सर्वात प्रथम टोकियो ऑलिम्पिकमधील दमदार कामगिरीनंतर प्रकाशझोतात आली होती. तिला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नव्हते. मात्र तिने चौथे स्थान पटकावून सर्वांचे लक्ष वेधले. आज हुकलेल्या ऑलिम्पिक पदकाची भरपाई तिने एशियन गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून केली.

भारतीय महिला गोल्फरसाठी दीपस्तंभ

एशियन गेम्समध्ये सामन्याच्या सुरूवातीला आदिती आघाडीवर होती. मात्र दबावाच्या क्षणी तिला स्वतःवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

आदिती अशोक ही भारतातील महिला गोल्फरसाठी एक आदर्श खेळाडू आहे. ती 2016 पासून वरिष्ठ स्तरावर आपल्या दमदार खेळाने छाप सोडत आली आहे. तिने युरोपियन महिला टूर टायटल जिंकले. त्यानंतर ती व्यावसायिक गोल्फ स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेऊ लागली.

Asian Games 2023
Asian Games 2023 : भारतीय शूटर्सचा पदकांचा रतीब सुरूच; भारतीय संघाची रूपेरी कामगिरी

अवघ्या 5 वर्षाची असतानाच हातात गोल्फ स्टिक

सामन्य कुटुंबात जन्माला आलेल्या आदिती अशोकने वयाच्या 5 व्या वर्षी गोल्फ स्टिक हातात घेतली होती. कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या गवताळ मैदानावर तिने लगचेच आपल्या गोल्फ स्टिकने जादू दाखवायला सुरूवात केली होती.

बंगळुरूच्या नामांकित फ्रँक अँटनी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी राहिलेल्या आदितीचे गोल्फ स्पर्धांमुळे अभ्यासाकडे तसे दुर्लक्षत होत होते. आदिती अवघी 13 वर्षांची होती त्यावेळी तिने 2011 मध्ये आपली पहिली राज्य स्तरीय स्पर्धा जिंकली. तिने कर्नाटक ज्यूनियर आणि दक्षिण भारत ज्युनियर चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली.

आदितीने रचलेच अनेक इतिहास

लवकरच आदितीने महिला गोल्फ विश्वात आपला दबदबा निर्माण करण्यास सुरूवात केली. तिने 2012, 2013 आणि 2014 अशी सलग तीन वर्षे राष्ट्रीय ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली. तिने 2014 मध्ये ज्युनियर आणि सिनियर दोन्ही चॅम्पियनशिप जिंकून धमाका केला.

ती 2013 मध्ये एशियन युथ गेम्स, 2014 मध्ये युथ ऑलिम्पिक आणि एशियन गेम्स मध्ये खेळणारी भारताची पहिली महिला गोल्फर ठरली होती. ज्यावेळी तिने महिला ब्रिटीश अमॅच्युर स्ट्रोक प्ले चॅम्पियनशिप जिंकत जागतिक स्तरावर आपला डंका वाजवला.

त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात तिने इतिहास रचला. 18 वर्षाची असताना आदिती ही ऑलिम्पिक (रिओ) खेळणारी पहिला भारतीय महिला गोल्फर ठरली. ती ऑलिम्पिकमधील त्यावेळेची महिला गोल्फमधील सर्वात कमी वयाची खेळाडू देखील ठरली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com