आमच्या कर्णधारला कोणता विचार करुन हाकललं? अफगाण क्रिकेटपटू भडकले

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

अफगाणिस्तान निवड समितीने कर्णधार असघर अफगाणला तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे संघातील खेळाडू चांगलेच भडकले आहेत. फिरकीपटू राशिद खान आणि अष्टपैलू महंमद नाबी यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

काबूल : अफगाणिस्तान निवड समितीने कर्णधार असघर अफगाणला तडकाफडकी कर्णधारपदावरुन हटवल्यामुळे संघातील खेळाडू चांगलेच भडकले आहेत. फिरकीपटू राशिद खान आणि अष्टपैलू महंमद नाबी यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

''निवड समितीने घेतलेला हा निर्णय अत्यंत बेजबाबदार आणि एकतर्फी आहे. माझा या निर्णयला पूर्ण विरोध आहे. विश्वकरंडक तोंडावर आला असताना अफगाणनेच कर्णधारपदाची स६त्रे सांभाळावीत. संघाच्या यशात त्याचा मोठा वाटा आहे. विश्वकरंडकासारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी कर्णधार बदल्यामुळे संघातील स्थैर्य कमी होईल आणि संघाच्या कामगिरीवरही परिणाम होईल,'' असे मत राशिदने व्यक्त केले आहे.  

अफगाणिस्तानच्या निवड समितीने कोणतेही कारण न देता  कर्णधार पदावरुन अफगाणची हकालपट्टी केली. त्यानंतर आता गुलबदीन नैब, राशिद खान आणि रेहमत शाह यांना अनुक्रमे एकदिवसीय, ट्वेंटी20 आणि कसोची संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. 

नाबीनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तो म्हणाला,''मी संघातील वरिष्ठ खेळाडू असल्याने आणि संघाची प्रगती पाहिल्याने माझ्यामते कर्णधार बदलण्याची ही योग्य वेळ नाही. अफगाणच्या नेतृत्वाखाली संघाने चांगले यश मिळवले आहे आणि तोच संघासाठी योग्य कर्णधार आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afganistan Players Criticises Sacking Of Asghar Afghan As Afghanistan Captain