Rahmat Shah Injured Yet Bats for Team
esakal
Afghanistan vs Bangladesh ODI : अफगानिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या सामन्यात अफगानिस्तानचा अनुभवी फलंदाज रहमत शाहला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला व्हीलचेअरवर मैदानाबाहेर न्यावे लागलं. विशेष म्हणजे दुखापत झाली असतानाही तो मैदानात फलंदाजीसाठी उतरला. त्याच्या धाडसाचं सध्या कौतुक होतं आहे.