अफगाणिस्तानची फिरकीला पसंती

afghanistan-player
afghanistan-player

काबूल (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी फिरकी गोलंदाजांना पसंती दिली आहे. भारताविरुद्ध १४ जूनपासून होणाऱ्या या सामन्यासाठी त्यांनी मुजीब उर रहमान, अमिर हमजा, रशिद खान आणि झहिर खान या चार फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. 

मुजीब आणि रशिदला आयपीएलचा अनुभव आहे. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघातील १९ वर्षीय झहीर बोटाच्या दुखापतीमुळे आयपीएल खेळू शकला नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज हमजाने देशांतर्गत स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले आहे. 

अफगाणिस्तानने त्याच वेळी बांगलादेशाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंवर विश्‍वास टाकला आहे. कसोटी संघातील केवळ पाच खेळाडू टी-२०साठी निवडण्यात आले आहे. या दोन्ही संघांचे नेतृत्व असघर स्टॅनिकझई करणार आहे.

संघ पुढीलप्रमाणे
टी -२० - असघर स्टॅनिकझई (कर्णधार), नजीब तराकई, उस्मान घनी, महंमद शहजाद, मुजीब उर रहमान, नजिबुल्ला झद्रान, समिउल्ला शेनवारी, शफिकुल्ला, दावरिश रसुली, महंमद नाबी, रशिद खान, गुलबदिन नैब, करिम जनत, शर्फुद्दिन अश्रफ, शापूर झद्रान, अफताब आलम

कसोटी - असघर स्टॅनिकझई (कर्णधार), जावेद अहमदी, एहसानुल्ला, महंमद शहजाद (यष्टिरक्षक), मुजीब उर रहमान, नासिर जमाल, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, अफसर झझाई, महंमद नाबी, रशिद खान, अमिर हमजा, सय्यद शिरझाद, यामिन अहमदझाई, वफादार, झहिर खान.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com