VIDEO: पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी 'लुंगी डान्स' गाण्यावर बसमध्ये केला भांगडा

VIDEO: पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी 'लुंगी डान्स' गाण्यावर बसमध्ये केला भांगडा

IND vs ENG Match Lucknow World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 च्या 22व्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय नोंदवला. अफगाण संघाच्या विजयानंतर गौतम गंभीर, इरफान पठाण आणि रवी शास्त्री या दिग्गजांनी त्याचे अभिनंदन केले. विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ खूप आनंदी दिसत होता. त्याने बसमध्ये जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO: पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी 'लुंगी डान्स' गाण्यावर बसमध्ये केला भांगडा
India vs Pakistan : 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही खेळला जाऊ शकतो भारत अन् पाकिस्तान, जाणून घ्या समीकरण

विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ बसमध्ये प्रवास करताना 'लुंगी डान्स' गाण्यावर डान्स करताना दिसला. यावेळी त्यांचे अनेक खेळाडू डान्स करताना दिसले. हा विजय अफगाणिस्तानसाठी खूप खास होता.

कारण याआधी त्यांनी पाकिस्तानला कधीही पराभूत केले नव्हते. एकदिवसीय सामन्यातील पाकिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय आहे. 5 पैकी 2 विजयांसह अफगाणिस्तान संघ गुणतालिकेत 6 व्या स्थानावर आला आहे. त्याच्या खात्यात 4 गुण आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना सर्व सामने जिंकावे लागतील.

VIDEO: पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी 'लुंगी डान्स' गाण्यावर बसमध्ये केला भांगडा
PAK vs AFG: '8 किलो मटण खाता तरी फिटनेस...' बाबरच्या संघावर संतापला पाकिस्तानी दिग्गज

अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरी गाठणे कठीण आहे. पण ज्या प्रकारचा खेळ त्याने आतापर्यंत दाखवला आहे. तो अप्रतिम आहे. पाकिस्तानपूर्वी त्यांच्या संघाने चॅम्पियन इंग्लंडचा पराभव केला होता. मात्र पाकिस्तानला हरवून अफगाणिस्तानने आपल्या क्षमतेच्या जोरावर चांगल्या चांगल्या संघांना हरवू शकतो हे दाखवून दिले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह यांनी अनुक्रमे 48 आणि 77 धावांची खेळी करत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com