AFG vs PAK : म्हणे आशिया कप जिंकणार... बाबर सेनेचे अफगाणिस्तानसमोर सपशेल लोटांगण!

AFG vs PAK Babar Azam
AFG vs PAK Babar Azam esakal

AFG vs PAK Babar Azam : येत्या 30 ऑगस्ट पासून श्रीलंका आणि पाकिस्तान येथे आशिया कप खेळवला जाणार आहे. यंदा हा कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणून ओळखली जात आहे.

मात्र यापूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका श्रीलंकेत होत आहे. यातील पहिला सामना आज (दि. 22) हम्बनटोटा येथे सुरू आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र अफगाणिस्तानच्या फिरकीने पाकिस्तानच्या फलंदाजीला आपल्या तालावर नाचवले. आशिया कप जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानची अफगाणिस्तानसमोरच दाणादाण उडाली.

AFG vs PAK Babar Azam
Sachin Tendulkar : निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला दिली मोठी जबाबदारी, टक्केवारी वाढवण्याचा करणार प्रयत्न

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा अफगाणी गोलंदाजांनी 3 बाद 40 धावा अशी अवस्था केली. फजलहक फारूकीने पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमानला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर मुजीब उर रहमानने बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. यामुळे पाकिस्तानची अवस्था 2 बाद 7 धावा अशी झाली.

यानंतर सलामीवीर इमाम उल हकने मोहम्मद रिझवानच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजीबने रिझवानला 21 धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. मुजीबनंतर राशिद खानने आगा सलमानला 7 धावांवर बाद केलं.

India vs Ireland 3rd T20I : भारताच्या 'या' चार खेळाडूंच्या पदरी निराशाच; टीम इंडियाचे व्हाईट वॉशचे स्वप्नही भंगणार?

यानंतर इफ्तिकार अहमद आणि इमामने पाकिस्तानला शंभरी पार करून दिली. मात्र ही जोडी नैबने फोडली. त्याने इफ्तिकारला 30 धावांवर बाद केले. त्यानंतर अर्धशतक पूर्ण केलेल्या इमामला नैबने 61 धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले.

पाकिस्तानची अवस्था 6 बाद 152 धावा अशी झाली होती त्यावेळी शादाब खानने तळातील फलंदाजांना हाताशी घेत सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. मात्र मुजीब आणि राशिद खान यांच्यासमोर पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यांची अवस्था 43 षटकात 8 बाद 176 अशी झाली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com