रहमत शाहचे शतक; अफगाणिस्तान 5 बाद 271 

वृत्तसंस्था
Thursday, 5 September 2019

रहमत शाहने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने बांगलादेशविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेरीस 5 बाद 271 अशी मजल मारली.

चित्तगांव - रहमत शाहने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने बांगलादेशविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेरीस 5 बाद 271 अशी मजल मारली. अफगाणिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकाविणारा रहमत शाह पहिला फलंदाज ठरला. 

रहमत (102) आणि त्याने असगर अफगाणसह चौथ्या विकेटसाठी केलेल्या 120 धावांच्या भागीदारीमुळे बांगलादेशाच्या डावाने आकार घेतला. खेळ थांबला तेव्हा असघर 88, तर अफस झझाई 35 धावांवर खेळत होता. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 74 धावांची नाबाद भागीदारी केली. 

नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यावर अफगाणिस्तानचा डाव एकवेळ उपाहाराला 3 बाद 77 असा अडचणीत आला होता. त्यानंतर रहमत आणि असघर यांच्या भागीदारीने अफगाणिस्तानचा डाव सावरला. 

संक्षिप्त धावफलक - अफगाणिस्तान पहिला डाव 5 बाद 271 (रहमत शाह 102 -287 चेंडू, 10 चौकार, 2 षटकार, असघर अफगाण खेळत आहे 88, अफसर झझाई खेळत आहे 35, तईजुल इस्लाम 2-73, नईम हसन 2-43)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Afghanistan's first Test centurion Rahmat Shah