
दादाची तारेवरची कसरत, डिनर अमित शहांसोबत गुणगान ममता दिदींचे
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सौरव गांगुली यांच्या घरी भेट देत कुटुंबासमवेत जेवण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सौरव गांगुलीची ममता बॅनर्जी यांच्यासोबतच्या त्याच्या जवळच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींशी त्यांच्या संबंधाविषयी वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय नेेत्यांशी संबंधावरून दादाची तारेवरची कसरत सुरू असल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गांगुलीने पश्चिम बंगालचे मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांचेही कौतुक केले आणि कधीही संपर्क साधता येईल अशी व्यक्ती असल्याचे सांगितले. तसेच एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी गांगुलीने सांगितले की, "आमच्या माननीय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी माझ्या खूप जवळ आहेत, या संस्थेला मदत करण्यासाठी मी त्याच्याशी संपर्क साधला होता."
गांगुली पुढे सांगितले की, मी फरहाद हकीम यांच्याही खूप जवळ आहे. मी इयत्ता पहिलीत असल्यापासून ते मला पाहत आहेत. ते आमच्या कौटुंबाचे मित्र आहेत. त्याच्याशी संपर्क करणाऱ्याला मदत मिळते आणि मी त्याला अनेकदा फोनही केला आहे, असे दादाने सांगितले. शुक्रवारी शहा यांनी गांगुलीच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे माजी क्रिकेटपटू लवकरच राजकारणात हात आजमावू शकतो अशी चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचा: "एका गुंडाला वाचवण्यासाठी..."; मनीष सिसोदिया यांचा भाजपवर निशाणा
रात्रीच्या जेवण ही एक कौटुंबिक बाब असल्याचे सांगण्यात आले होते. गांगुली, त्याची पत्नी डोना गांगुली, सौरवचा मोठा भाऊ स्नेहशिष गांगुली आणि इतर कुटुंबातील सदस्यांनी या जेवणाचे आयोजन केले होते. शाह यांच्यासोबत भाजपच्या विचारवंत स्वप्ना दासगुप्ता, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी होते.
या चर्चांदरम्यान गांगुलीने शुक्रवारी सांगितले की, "अनेक प्रकारचे तर्क लावले जात आहेत... पण मी त्यांना (शहा) 2008 पासून ओळखतो. क्रिकेट खेळताना मी त्याला भेटायचो. यापेक्षा जास्त काही नाही." तसेच त्यांनी शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यासोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळात काम केले आहे, असेही सांगितले. जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.
हेही वाचा: जलील यांनी विचारलेल्या घराणेशाहीच्या प्रश्नावर आदिती तटकरेंनी दिलं खणखणीत उत्तर
Web Title: After Dinner With Amit Shah Sourav Ganguly Talks On His Relationship With Mamata Banerjee
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..