
जलील यांनी विचारलेल्या घराणेशाहीच्या प्रश्नावर आदिती तटकरेंनी दिलं खणखणीत उत्तर
राज्याच्या राजकारणात एकाच घरातील अनेक जण नेते म्हणून पुढे येतात, राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत की वडीलांपाठोपाठ मुले देखील राजकीयय क्षेत्रात दाखल झाली आणि पुढे मंत्रीपदावर काम करत आहेत. याबाबत खासदार इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी सरकारनामा ओपन माइक कार्यक्रमात आदिती तटकरेंना राजकरणातील घराणेशाहीवर 'बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळायला आहेत का?' असा तिखट प्रश्न विचारला.
खासदार जलील यांनी आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना प्रश्न विचारला की, 'आपल्या घरातील किती लोक हे राजकार मोठ्या पदावर आहेत? तुमचे वडील लोकसभेत तुम्ही विधानसभेत मग बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळायला आहेत का?' या थेट विचारण्यात आलेल्या प्रश्नाला आदिती तटकरे यांनी तेवढ्याच समर्थपणे खणखणीत उत्तर देखील दिलं.
अदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही तीन जण पदावर आहोत, एक वडील लोकसभा खासदार आहेत, मी विधानसभा आणि भाऊ विधानपरिषदेत आहे, आणि वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही निवडणूक न लढता निवडूण आलेला नाहीये, लोकांमधूनच निवडूण आले आहेत, तसेच कार्यकर्त्यांना मंजूर असेल म्हणूनच त्यांनी निवडूण दिलं असेल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा: 'आधी बुलेट ट्रेन, समृद्धीवर चर्चा, आता...'; सदाभाऊंची मविआवर टीका
पुढे खासदर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी, आपण परिवारात सगळ्यात लहान असून, सर्वात कमी वयात मंत्री झालात, वडील लोकसभेत आहेत, तुम्हाला मंत्री म्हणून लोकसभेत जायला आवडेल का? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना तटकरे म्हणाल्या की, सध्या ही पहिलीच टर्म आहे, वडील २५ वर्ष आमदार राहीले त्यानंतर खासदार झाले. यांनंतर आमदार धीरज देशमुख यांनी एक पेचात टाकणारा प्रश्न विचारला. तसेच त्यांनी प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे, एकाची निवड करावी लागेल अशी अट घालत, 'अजितदादा की सुप्रियाताई?' असा प्रश्न त्यांना केला. यावर आदिती तटकरे यांनी, राज्यात अजितदादा आणि केंद्रात सुप्रियाताई असं सोप उत्तर देत हा पेच सोडवला.
हेही वाचा: रोहीत पवार म्हणाले, "परीक्षा पुढे ढकलली जाणं दुर्दैवी पण,..."
यानंतर पुढे आमदार परिणय फुके यांनी प्रश्न केला की, तुमचं काम बघून जर पक्षश्रेष्ठींना वाटलं की, तुमतं प्रमोशन करावं तर तुम्हाला गृह खातं, अल्पसंख्याक खातं यापैकी कोणत्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री व्हायला आवडेल?. या प्रश्नाचे उत्तर देताना आदिती तटकरे यांनी मी सध्यातरी राज्यमंत्री म्हणून खूश आहे, पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री मिळणं पण मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच सध्याची महाविकास आघाडी सरकारची स्थिती पाहता २५ वर्ष हे सरकार टिकायला हरकत नाही, त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेट मंत्रीपद मिळालं तर चांगलं होईल, असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.
Web Title: Aditi Tatkare Amswer Imtiyaz Jaleel Question Over Family Members Joining Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..