Video : 'बीबीएल'मध्ये अफगाण-पाक गोलंदाजांनी घेतल्या हॅट्ट्रिक!

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

राशिदच्या हॅट्ट्रिकनंतर सिडनी थंडर्सच्या हॅरिस रॉफनंही कमाल करत मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली.

बिग बॅश 2020 : मेलबर्न : सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग (बीबीएल) या स्पर्धेत दररोज नव्याने विक्रम रचले जात आहेत. नव्या वर्षाची धूमधडाक्यात सुरवात करत अनेक खेळाडूंनी वर्षाची चांगली सुरवात केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

2020 या वर्षातील पहिले शतक ठोकण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या मार्न्स लाबुशेनच्या नावावर जमा झाला. त्यानंतर या वर्षातील पहिली हॅट्ट्रिक घेण्याचा मान अफगाणिस्तानचा जगप्रसिद्ध फिरकीपटू राशिद खानने पटकावला आहे. अ‍ॅडलेड स्ट्रायकर संघाकडून खेळताना राशिदने ही कामगिरी केली. स्ट्रायकर आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील हा सामना रोमहर्षक झाला. मात्र, सिडनी सिक्सर्सने दोन गडी राखत विजय मिळवला. 

- INDvsNZ : न्यूझीलंड संघ खेळणार कसा? दुखापतीने 'हे' चार महत्वाचे खेळाडू संघाबाहेर

प्रथम फलंदाजी करताना स्ट्रायकरने 135 धावांचे आव्हान उभारले. स्ट्रायकरच्या जॅक विदराल्ड (47) आणि कॅप्टन अॅलेक्स कॅरी (32) यांनी चांगली खेळी केली. मात्र, सिडनी सिक्सर्सच्या टॉम करण (22/4), बेन ड्वॅर्शूइस (20/2) आणि लॉयड पोप (33/2) यांच्या भेदक माऱ्यापुढे इतर फलंदाजांचा टिकाव लागला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

HAT-TRICK! Rashid Khan, you genius! #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on

या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिडनी सिक्सर्सला सुरुवातीला धक्के बसले. जो व्हिंस (27) आणि टॉम करण (21) यांनी धावफलक हलता ठेवला. राशिद खानने 11व्या षटकाच्या अखरेच्या दोन चेंडूंवर व्हिंस आणि एडवर्ड यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉर्डन सिल्कचा त्रिफळा उडवत हॅट्ट्रिक नोंदवली.

- 'अ' दौऱ्यातून पृथ्वी शॉ बाहेरच

2020 वर्षातील ही पहिली हॅट्ट्रिक ठरली. मात्र, राशिदची ही हॅट्ट्रिक त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या सामन्यात सिक्सर्सने 2 गडी आणि 8 चेंडू राखत विजय साजरा केला. 

राशिदच्या हॅट्ट्रिकनंतर सिडनी थंडर्सच्या हॅरिस रॉफनंही कमाल करत मेलबर्न स्टार्स संघाविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली. सिडनी थंडर्सच्या मॅथ्यू गिल्क्स, कैलम फर्गसन आणि डॅनियल सॅम्स यांना बाद करत हॅट्ट्रिक साजरी केली. सिडनी थंडर्सने 20 षटकांत 5 बाद 145 धावांचे आव्हान उभारले होते.

- खेळाडूंसाठी खुषखबर ; 'टबाडा' ठरणार वरदान

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

THE MCG IS ROCKING! Haris Rauf takes a hat-trick, can you believe it?! #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Rashid Khan Pakistan player Haris Rauf claims 2nd hat trick in BBL