T-20 WC: ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अजब सेलिब्रेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australian Cricket Player

T-20 WC: ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचं अजब सेलिब्रेशन

ऑस्ट्रेलियाच्या संघाने रविवारी एक नवा इतिहास रचला. दुबईत पार पडलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 8 गडी राखत न्यूझीलंडचा पराभव करून त्यांनी प्रथमच या फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. साहजिकच यानंतर मोठा जल्लोष झाला. मात्र सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऑस्ट्रेलियन संघाचे खेळाडू या सेलिब्रेशनमध्ये एवढे बेधुंद झाले की त्यांनी जल्लोष करण्याच्या सीमा ओलांडल्या.

ऑस्ट्रेलियन संघाच्या पार्टीदरम्यानचा एक व्हीडिओ समोर आला असून, यामध्ये खेळाडू थेट बुटामध्ये टाकून बिअर पिताना दिसतो आहे. आयसीसीने सोमवारी एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस शूजमध्ये बिअर पिताना दिसत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने 4 गडी गमावून 172 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. त्यासाठी कर्णधार केन विल्यमसनने 48 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारां करत 85 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत 2 गडी गमावत लक्ष्य गाठले. मिचेल मार्शने 50 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 77 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि नाबाद परतला. तर डेव्हिड वॉर्नरने 38 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावा केल्या.

हेही वाचा: T20 WC: ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये?

यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मोठा जल्लोष साजरा केला. त्यातच आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस बुटामध्ये टाकून बिअर पिताना दिसत आहेत. वेडने बुट काढला आणि त्यात बिअर ओतली आणि मग ती प्यायली सुद्धा. यानंतर स्टोइनिसने तोच बूट पकडला आणि तो बिअर पिताना दिसला. अवघ्या 20 मिनिटांत हा व्हिडिओ 30 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

loading image
go to top