T20 WC, Prize Money For Winning Team : ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Australia vs New Zealand
T20 WC: ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये?

T20 WC: ऑस्ट्रेलियासह न्यूझीलंडही मालामाल! किती बक्षीस मिळाले माहितीये?

sakal_logo
By
सुशांत जाधव

T20 WC Final: ऑस्ट्रेलिया (Australia) ने न्यूझीलंड विरुद्धच्या फायनल लढतीत बाजी मारली. या विजयासह पाचवेळच्या वनडे वल्ड चॅम्पियन संघाने टी-20 जगतातील पहिली वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली. सलामीवीर डेविड वॉर्न आणि मिशेल मार्श या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. डेविड वॉर्नर अर्धशतक करुन तंबूत परतल्यानंतर मार्शनं 50 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी साकारली. आपल्या या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार लगावले.

वॉर्नरने 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. मार्शला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले तर डेविड वॉर्नर मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरला. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये बाबर आझम अव्वलस्थानी राहिला. त्याने 6 सामन्यात 303 धावा केल्या. याशिवाय श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा याने 16 विकेटसह गोलंदाजीत अव्वलस्थानी राहिला. त्याच्यापाठोपाठ एडम झम्पाने 13 विकेट घेतल्या.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

विजेत्या टीमला मिळाली एवढी मोठी रक्कम

युएईच्या मैदानात झालेल्या स्पर्धेचे आयोजन हे बीसीसीआयने केले होते. या स्पर्धेच्या यजमान असूनही टीम इंडियाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला 12 कोटीचे बक्षीस मिळाले. तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला 6 कोटीचे बक्षीस मिळाले. या दोन्ही संघांशिवाय सेमी फायनलपर्यंत पोहचलेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड संघाला प्रत्येकी 3-3 कोटी रुपये मिळाले.

हेही वाचा: न्यूझीलंड हरलं अन् केन विल्यमसनचा भला मोठा पराक्रम हुकला!

न्यूझीलंडच्या पदरी पुन्हा एकदा निराशा

2015 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये मेलबर्नच्या घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने न्यूझीलंडचे विश्वविजेता होण्याच्या स्वप्नाचा चक्काचुरा केला होता. मायकल क्लार्कच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने ब्रँडम मॅक्युलमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्यानंतर 2019 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला इंग्लंडकडून घरच्या मैदानावर पराभूत व्हावे लागले होते. मॅच टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमधील टायनंतर सामन्याचा निकाल हा बाउंड्री काउंच्या माध्यमातून देण्यात आला होता. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून न्यूझीलंडने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील पराभवाची मालिका खंडीत केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्या पदरी निराशा आली.

loading image
go to top