ISSF Shooting World Cup : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरचा सुवर्णवेध

Aishwary Pratap Singh Tomar won the gold medal in ISSF Shooting World Cup
Aishwary Pratap Singh Tomar won the gold medal in ISSF Shooting World Cupesakal
Updated on

चांगवॉन : भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने (Aishwary Pratap Singh Tomar) आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत (ISSF Shooting World Cup) आज (दि. 16) 50 मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तोमरने हंगेरीच्या झलान पेकलारचा 16-12 असा पराभव केला. ऐश्वर्य प्रताप सिंहने पात्रता फेरीत देखील 593 गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले होते.

Aishwary Pratap Singh Tomar won the gold medal in ISSF Shooting World Cup
Sri Lanka Crisis: पेट्रोल भरण्यासाठी क्रिकेटपटू 2 दिवस रांगेत; 10 हजाराला फटका

दरम्यान, 50 मीटर थ्री पोजिशन रायफल (50m Rifle 3 Positions Event) प्रकारात हंगेरीचा अनुभवी खेळाडू इस्तेवान याला कांस्य पदक मिळाले. रँकिंग राऊंडमध्ये तोमरने पहिल्या दोन नेलिंग आणि प्रॉन पोजिशन मध्ये अचूक वेध घेत अव्वल गुण मिळवले. मात्र शेवटच्या स्टँडिंग पोजिशनमध्ये त्याने सर्व 7 गुण गमावले. या प्रकारात सहभागी झालेला भारताचा दुसरा शूटर चौनसिंह सातव्या स्थानावर राहिला.

Aishwary Pratap Singh Tomar won the gold medal in ISSF Shooting World Cup
World Championship : मुरली श्रीशंकर लांब उडीच्या फायनलला जाणारा पहिला भारतीय खेळाडू

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ने ट्विट केले.

साईने 'भारताने सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने आयएसएसएफ शूटिंग वर्ल्ड कप 2022 चांगवॉन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com