Ajaz Patel
Ajaz Patelesakal

Ajaz Patel : मुंबई टू ऑकलंड एजाज पटेलचा रंजक प्रवास

सँटनर जायबंदी झाला आणि न्यूझीलंडला एजाज पटेल मिळाला

मुंबई : न्यूझीलंडच्या डावखुऱ्या एजाज पटेलने ( Ajaz Patel ) भारतात येऊन भारताच्या संघाविरुद्धच भारताच्या महान गोलंदाजाच्या विक्रमाशी बरोबरी केली. एजाज पटेलने भारतातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर एका डावात १० विकेट घेण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली. या कामगिरीनंतरच एजाज पटेलची भारतीयांना ओळख झाली.

भारतीय वंशाच्या एजाज पटेलचा ( Ajaz Patel ) जन्म हा मुंबईत झाला. त्या मुंबईतच त्याने आपल्या कारकिर्दितील सर्वोच्च कामगिरी केली. ज्यावेळी पटेल मुंबईतून ऑकलंडला गेला त्यावेळी सुरुवातीला त्याला ऑकलंडकडून संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.

Ajaz Patel
पटेलचा वर्ल्ड रेकॉर्ड; कुंबळे अन् जीम यांच्या विक्रमाशी बरोबरी

मात्र या गुणी फिरकीपटूची सेंट्रल डिस्ट्रीक्टने पारख केली आणि त्याला संघात स्थान दिले. एजाजनेही ( Ajaz Patel ) या संधीचे सोने करत २०१२ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने प्लेंकेट शिल्ड स्पर्धेत ९ सामन्यात तब्बल ४८ विकेट घेत आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. तसं पाहिलं तर प्रथम श्रेणीत एजाज पटेल ( Ajaz Patel ) कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेट खेळतो. मात्र त्याचं खरं प्रेम हे कसोटी क्रिकेटच आहे.

एजाज पटेल प्रथम श्रेणीत खोऱ्याने विकेट घेत होता मात्र त्याचा न्यूझीलंडच्या संघातील प्रवेश खडतर होता. मिचेल सँटनर त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या आडवा उभा होता. फलंदाजीच्या बाबतीत सँटनर हा एजाज ( Ajaz Patel ) पेक्षा सरस होता. परंतु सँटनर पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेआधी जायबंदी झाला आणि एजाज पटेलला न्यूझीलंडच्या संघाची दारे उघडले.

Ajaz Patel
India Tour of South Africa : रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी?

युएईमध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत एजाजने चांगली कामगिरी करुन आपली गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तो सामना पाकिस्तान ४ धावांनी हरला होता. त्यानंतर अवघ्या ११ कसोटींचा अनुभव असलेल्या एजाजने फिरकीचे माहेरघर असलेल्या भारतात फिरकी खेळण्यात हातखंडा असलेल्या भारताचाच संपूर्ण संघ एका डावात गारद केला. आता तो अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com