esakal | रहाणेचे शानदार शतक; विंडीजसमोर 419 धावांचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya Rahane Century

जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेच्या मालिकेतील विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रविवारी चौथ्या दिवशी भारताने चहापानापूर्वी 7 बाद 343 धावसंख्येवर भारताचा दुसरा डाव घोषित केला. विंडीजसमोर आता विजयासाठी 419 धावांचे आव्हान आहे. 

रहाणेचे शानदार शतक; विंडीजसमोर 419 धावांचे आव्हान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नॉर्थ साऊंड (अँटिगा) - मधल्या फळीत उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने शानदार शतक झळकावून आपल्या फॉर्मविषयी टिका करणाऱ्यांना चोक उत्तर दिले. रहाणेला शतका पूर्ण करण्यात यश आले असले, तर हनुमा विहारी मात्र शतकापासून वंचित राहिला. 

जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्‍यपद स्पर्धेच्या मालिकेतील विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रविवारी चौथ्या दिवशी भारताने चहापानापूर्वी 7 बाद 343 धावसंख्येवर भारताचा दुसरा डाव घोषित केला. विंडीजसमोर आता विजयासाठी 419 धावांचे आव्हान आहे. 

पहिल्या डावात 81 धावांची जबाबदारीची खेळी करणाऱ्या रहाणे याने दुसऱ्या डावात शानदार शतक साजरे केले. तिसऱ्या दिवशी रहाणे आणि कोहली ही उपकर्णधार आणि कर्णधारांची जोडी नाबाद होती. मात्र, चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली तेव्हा दिवसातल्या पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर रोस्टन चेसने कोहलीला बाद केले. त्यावेळी भारताने कालच्या धावसंख्येत केवळ दोनच धावांची भर घातली होती, तर कोहलीला वैयक्तिक धावसंख्येत एकाही धावेची भर घालता आली नाही. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एकत्र आलेल्या रहाणे-हनुमा विहारी यांनी नेटाने फलंदाजी केली. विंडीज गोलंदाजांना पहिल्या षटकातील मोठ्या यशाचे फारसे समाधान त्यांनी लाभू दिले नाही. रहाणेने संयमाने फलंदाजी करताना कारकिर्दीमधील दहावे शतक साजरे केले. विहारीने देखील अर्धशतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर रहाणे लगेच बाद झाला. त्याने 242 चेंडूंत अवघ्या पाच चौकारांच्या सहाने 102 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर रिषभ पंतला खेळपट्टीवर टिकून रहाता आले नाही. त्याने सातच धावा केल्या. तोपर्यंत विहारी शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. मात्र, शतकासाठी सात धावांची आवश्‍यकता असताना तो बाद झाला आणि कर्णधार कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला. विहारीने 128 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह 93 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक ः भारत 297 आणि 7 बाद 343 घोषित (अजिंक्‍य रहाणे 102, हनुमा विहारी 93, विराट कोहली 51, चेस 4-132) वि. वेस्ट इंडिज 222 

loading image
go to top